Home > News Update > राज्यात लॉकडाऊन किती दिवसांचा असेल? राजेश टोपे काय म्हणाले

राज्यात लॉकडाऊन किती दिवसांचा असेल? राजेश टोपे काय म्हणाले

राज्यात लॉकडाऊन किती दिवसांचा असेल? राजेश टोपे काय म्हणाले
X

कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे.असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षीय बैठकीत राज्यात लॉकडाऊन लावण्याचे संकेत जनतेला दिले आहेत. त्यामुळं राज्यात लॉकडाऊन लागणार याचा अंदाज राज्यातील जनतेला आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एक ते दोन दिवसात घोषणा करणार आहेत. मात्र, हा लॉकडाऊन किती दिवसाचा असेल या संदर्भात अद्यापर्यंत निर्णय झालेला नाही.

या संदर्भात आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली…


राज्यात लॉकडाऊन हा कमीत कमी 15 दिवसांचा असेल. लॉकडाऊनची सर्वांच्या मनाची तयारी झाली आहे. अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री घेतील, असं टोपे यांनी सांगितलं आहे. यावेळी रेमडेसिवीरवर इंजेक्शनच्या नियंत्रणासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांना आता रेमडेसिवीर जिल्हाधिकारी कार्यालयातून घ्यावं लागणार आहे. अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

Updated : 11 April 2021 1:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top