केरळच्या मधील १४ दहशतवाद्यांचा काबुल हल्ल्यामध्ये समावेश
X
अफगाणिस्तानच्या काबुल एअरपोर्टवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासान प्रोविंस गटाने घेतली आहे. त्यामध्ये १४ भारतीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हे १४ जण केरळमध्ये राहणारे आहेत. यातील एकाने केरळ मधल्या आपल्या घरी संपर्क केला असून भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तालिबान काबुलवर कब्जा केल्यानंतर बगराम जेलमध्ये असलेल्या या १४ जणांना सोडून दिलं. या मध्ये तालिबानसह आतंकवादी संघटनेचे लोकं होते. यानंतर तुर्तमेनिस्तानच्या दूतावासांवर हल्ला करण्याच्या प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला. यामध्ये इस्लामिक स्टेटच्या दोन लोकांना अटक ही केली असता यामध्ये दोन पाकिस्तानचे असल्याचं समजतंय.
केरळ ते मोसूल काय आहे कनेक्शन?
केरळच्या या १४ दहशतवाद्यांसंदर्भात संपूर्ण माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. परंतु २०१४ मध्ये इस्लामिक स्टेटने इराक मधील मोसुल शहरावर ताबा मिळवला होता. त्यावेळी केरळ च्या अनेक जिल्ह्यातील लोक मोठ्याप्रमाणात इराक आणि मध्यपूर्वमधील दुसऱ्या देशात निघून गेले.
हे लोक इस्लामिक स्टेट च्या ऑनलाईन प्रसार माध्यमातून प्रभावित झाले होते. त्यावर व्हिडिओ पाहायचे. या व्हिडीओमधून मुख्यत: काफिर च्या विरोधात विद्रोह करणे आणि आपल्याला निजाम-ए-मुस्तफा म्हणजे पैगंबराचं राज्य स्थापन करायचं असल्याचं या व्हिडीओतून सांगितलं जात होतं. यामध्ये कासरगड, मल्लापुरम आणि कन्नुल जिल्ह्यातील सुशिक्षित लोकांचा समावेश आहे. यामध्ये काही इंजिनियरचा देखील समावेश आहे. केरळमधून काही लोक अफगाणिस्तानच्या ननगरहार मध्ये स्थायिक झाले होते आणि इस्लामिक स्टेटसाठी काम करत होते.
केरळ कनेक्शन
मार्च २०२० मध्ये अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये एका गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये एक भारतीय होता. त्याची ओळख महुम्मद मुहसिन म्हणून केली गेली होती.
मुहसिन केरळ च्या कन्नूर जिल्ह्यात राहणारा होता. २०१८ ला तो अफगाणिस्तान गेला. तो इस्लामिक स्टेट प्रोविन्समध्ये सहभागी झाला. केरळ च्या कासरगड आणि मल्लापुरम जिल्ह्यातून २०१६ मध्ये कमीत-कमी दोन डझन तरुण अफगाणिस्तानला जाऊन इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झाले होते.
केरळ ते अफगाणिस्तान
केरळ पोलिसांनी ऑगस्ट २०२० मध्ये इंडियन एक्सप्रेस ला सांगितलं होत की, मुहसिन केरळमधून गेलेल्या २१ तरुणांच्या टोळीत सामील नव्हता. मुहसिन २०१८ मध्ये केरळ च्या पयन्नूर मधून नोकरीसाठी दुबईला गेला होता. तिथून तो अफगाणिस्तानला गेला. मुहसिनने शाळेतूनच शिक्षण सोडलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
दरम्यान मुहसिन च्या आईने सांगितलं होतं की, इस्लामिक स्टेट ने सोशल मीडिया साईटवरील टेलीग्राम वर सांगितलं की तुमचा मुलगा शहीद झाला आहे. हा टेलिग्रामचा मेसेज महुसिनच्या आईने पोलिसांना दाखवला नाही. भितीने तो मेसेज तिने डीलिट केला होता.
आंध्र कनेक्शन
हैद्राबादच्या बासित आणि दुसऱ्या तीन लोकांनी सप्टेंबर २०१४ साली भारत सोडून जाण्याची योजना केली होती. मात्र, ISIS मध्ये सहभागी होण्याची माहिती मिळताच त्यांना कोलकत्त्यात थांबवण्यात आलं आणि हैदराबादला आणण्यात आलं होतं.
बासित याच्यावर आरोप आहे की, तो अबूधाबीमधल्या ISIS मॉड्यूलसोबत २०१६ ला जोडला गेला होता. त्याने कर्नाटक च्या एका तरुणाला आयएसआयएस पर्यंत पोहचण्यासाठी ५० हजार रुपये दिले होते.
श्रीलंका च्या इस्टर हल्ल्यात हात?
श्रीलंकेमध्ये २०२० ला इस्टर रविवारी चर्च आणि हॉटेल्सवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्लामिक स्टेट ने हा हल्ला आम्ही केल्याचा दावा केला होता. एनआयए ने रियाज अबू बकर याला ISIS संबंधित असल्याच्या आरोपात केरळ कोच्चीतून अटक केली होती. केरळ च्या पलक्काड जिल्ह्याच्या कमब्रथचाला गावात राहणारे रियाज चे वडिल मुलाच्या कारस्थानामुळे हादरून गेले होते.
संयुक्त राष्ट्रचा रिपोर्ट
या अगोदर जुलै २०२० मध्ये संयुक्त राष्ट्रने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की, केरळ आणि कर्नाटक मध्ये इस्लामिक स्टेटचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. त्याच्याव्यतिरिक्त अल-कायदा संघटनेचे १५०-२०० लोकांचा ही भागात वावर असल्याचं संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हटलं होतं.
या दहशतवादी संघटनेमध्ये भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि म्यानमार मधील लोकांचा समावेश आहे. ते हल्ल्याची योजना तयार करतात. संयुक्त राष्ट्रने एनलिटिकल सपोर्ट अँड सेंक्शन मॉनीटरींग टीमने आपल्या २६ व्या अहवालात भारतात सामील असलेले अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट वर गंभीर चिंता व्यक्त केली.
या अहवालात, भारत उपमहाद्वीपमध्ये अलकायदा संबंधित लोक राहत असल्याचं म्हटलं आहे. हे लोक अफगाणिस्तान च्या निमरुज, हेलमंद आणि कंधाक प्रांतातील तालिबान्यांच्या नियंत्रणामध्ये आहेत.