Home > News Update > पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी

पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी

पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी
X

पुणे// पुण्यातील बालेवाडी परिसरात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी झाल्याची घटना

घडली आहे. बालेवाडीमधील पाटील नगर येथे बांधकाम सुरू असताना इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी १२ जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. जखमी झालेल्या १२ जणांपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Updated : 31 Oct 2021 8:30 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top