देशात बर्ड फ्लूचा पहिला बळी, टाळ्या आणि थाळ्यांनी काही होणार नाही - सामना
X
देशात कोरोनाचे संकट अजून कायम असताना आता आणखी एक चिंतेची बाब समोर आली आहे. आतापर्यंत कोंबड्यांमध्ये आढळणाऱ्या बर्ड फ्लूने देशातील पहिला बळी घेतला आहे, दिल्लीमध्ये एका 11 वर्षांच्या मुलाचा बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे. त्याच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. सुरूवातीला खोकला आणि ताप असल्याने त्याला कोरोनाचा संसर्ग असण्याची शक्यता डॉक्टरांना वाटली. पण त्यानंतर कोरोनाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. पुढील चाचण्यांमध्ये त्याला बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आता या मुलाच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
बर्ड फ्लूचे संकट आता देशात तयार होत असल्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केंद्र सरकारला या संकटाशी लढण्याची तयारी करण्याचे आवाहन केले आहे. सामनाच्या अग्रलेखातून याच मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका कऱण्यात आली आहे.
"आतापर्यंत बर्ड फ्लू म्हणजे कोंबडय़ा आणि इतर पाळीव पक्षी असे समीकरण होते. मात्र आता देशाच्या राजधानीतच बर्ड फ्लूने पहिला बळी घेतल्याने बर्ड फ्लू आणि माणूस असेही समीकरण होण्याचा धोका आहे. दिल्लीत बर्ड फ्लूने जो 'अलार्म' वाजविला आहे त्याचा विचार गंभीरपणे करण्याची गरज आहे. केंद्र सरकार आणि आरोग्य यंत्रणेने आताच खडबडून जागे व्हावे. कोरोना जसा 'टाळय़ा आणि थाळय़ां'नी गेला नाही तसा बर्ड फ्लूदेखील जाणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे."
असा चिमटेही या अग्रलेखातून काढण्यात आले आहेत.