100 Crore Vaccine: सावध राहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशाला इशारा
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील नागरिकांना संबोधित केले आहे. देशभरात 100 कोटी लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी जनतेशी संवाद साधला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र यांनी यांनी...
100 कोटी लसीचा डोस हा केवळ एक आकडा नसून ते नवीन भारताचे चित्र आहे. देशाच्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे, हा देशातील एक नवीन अध्याय आहे. 100 कोटी लसीचा डोस हा कोरोना महामारीच्या बाबतीत उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.
आज अनेक लोक भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची इतर देशांशी तुलना करत आहेत, आज जगात भारताचेही कौतुक होत आहे. कोरोना महामारीच्या प्रारंभी, भारतासारख्या लोकशाही देशात या साथीचा सामना करणे खूप कठीण होईल. अशी भीती व्यक्त केली जात होती. भारतासाठी, भारतातील लोकांसाठी असेही म्हटले जात होते की, इतका संयम, इतकी शिस्त येथे कशी चालेल? पण आमच्यासाठी लोकशाही म्हणजे 'सबका साथ'. "
लसीकरण कार्यक्रमात VIP Culture येऊ नये म्हणून काळजी घेण्य़ात आली. देशाला मोठी ध्येये कशी ठरवायची आणि ती कशी साध्य करायची हे माहित आहे. परंतु, यासाठी आपण सतत सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण निष्काळजी राहून चालणार नाही. लसीकरणाचं कवच कितीही आधुनिक असो, कवच कितीही चांगलं असो तरीही जोपर्यंत युद्ध संपत नाही. तोपर्यंत हत्यार ठेवली जात नाही. त्या प्रमाणे जोपर्यंत कोरोना जात नाही. तोपर्यंत काळजी घेण्याचं आवाहन मोदी यांनी जनतेला केलं आहे.