Home > News Update > राज्यातील १० मंत्री, २० आमदारांना कोरोना

राज्यातील १० मंत्री, २० आमदारांना कोरोना

राज्यातील १० मंत्री, २० आमदारांना कोरोना
X

राज्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे लोकांनी कोरोना निर्बंधांचे पालन करावे आणि मास्कचा वापर करावा असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

त्याचबरोबर राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर तर निर्बंध वाढवावे लागतील, असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे. दररोज रुग्णांची संख्या किती वाढते आहे, ते पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.

भिमा कोरेगान येथे विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर अजित पवार हे पत्रकारांशी बोलत होते. विधिमंडळाचे अधिवेशन केवळ ५ दिवसांचे केले तरी १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहिले पाहिडे, नियमांचे पालन केले पाहिजे असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

लॉकडाऊनबद्दल बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, कोरोनाच्या रुग्णांची संख्या दररोज किती प्रमाणात वाढते आहे, याचा विचार करुन निर्णय घेतला जाईल. पण जर रुग्णांची संख्या वेगाने वाढायला लागली तर मात्र सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक रुग्णवाढ होते आहे, हा संसर्ग इतरही ठिकाणी पसरतो आहे, त्यामुळे हा प्रसार रोखण्याचे प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Updated : 1 Jan 2022 7:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top