Bhandara Hospital Fire: मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
Bhandara Hospital Fire: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
X
भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना घडली आहे. भंडाऱ्यात नवजात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बालकं दगावली आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती येत आहे. रात्री दोन च्या सुमारास ही आग लागली होती. या आगीच्या धुरामुळे गुदमरून लहान बालकांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
कर्तव्यावर असणाऱ्या नर्स ने शिशू केअर युनिट मधून येत असलेल्या धुराबाबत हॉस्पिटलच्या इतर स्टाफला कळवले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ इथल्या बालकांना बाहेर काढले. शिशू केअर युनिटमधील सात बालकांना वाचवण्यात यश आलं. मात्र आऊटबॉर्न युनिटमधल्या 10 बालकांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. तसेच या घटनेतील मृत बालकांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत केली जाईल. लवकरच रुग्णालयात जाऊन मी स्वत: पाहणी करेन असं सांगितलं.