Home > News Update > "दाल में कुछ काला है" विधान परिषदेत Shaktipeeth Highway वरून गदारोळ....

"दाल में कुछ काला है" विधान परिषदेत Shaktipeeth Highway वरून गदारोळ....

रद्द करा, रद्द करा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा..., विरोधकांची घोषणाबाजी....

दाल में कुछ काला है विधान परिषदेत Shaktipeeth Highway वरून गदारोळ....
X

मुंबई(विधानभवन)- शक्तीपीठ महामार्ग हा नेमका कोणा साठी ? देवस्थान जोडण्या साठी की इलेक्ट्रिकल बॉण्ड देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला, कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी आहे? असे सवाल करत सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी विधापरिषदेत शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला.

शक्तीपीठ महामार्ग हा पत्रादेवी बांदा (ता. सावंतवाडी,जिल्हा रत्नागिरी) ते दिग्रज (जिल्हा- वर्धा) असा हा शक्तीपीठ महामार्ग होणार आहे. या मध्ये सत्तावीस हजार पाचशे एकर जमिन ही संपादित कऱण्यात येणार आहे. या मुळे बारा जिल्हातील हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शक्तीपीठ महामार्गालां शेतकऱ्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत आहे. या मुळे हा महामार्ग रद्द करावा असे मत सतेज ऊर्फ बंटी पाटील व विरोधी पक्षाने मांडले.

एकूण ८०५ किलोमिटर चा हा महामार्ग असून या महामार्गास साधारण 86 हजार कोटी रुयांचा खर्च देखील येणार आहे. या विषयावर सभागृहात चर्चा चालू असताना गदारोळ पाहिला मिळाला. सदर महामार्ग बांधण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेल्या कंपनीचा देखील उल्लेख सभागृहात झाला. "मोनार्क कंपनी तुमची जावई आहे का.समृद्धी महामार्ग मध्ये देखील हीच कंपनी कशी होती." असे देखील वक्तव्य सतेज पाटील यांनी केले.

शक्तीपीठ महामार्गाला विधान परिषदेमध्ये विरोध करत असताना. विरोधक हे विधान परिषदेच्या लॉबीमध्ये आले.

"शक्तीपीठ महामार्ग,दाल में कुछ काला है...."

"40 टक्के कमिशन खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.."

"शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे."

अशी घोषणाबाजी देखील विरोधी पक्षाकडून करण्यात आली.

आज शक्तीपीठ महामार्गावरून विधान परिषदेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. लक्षवेधी च्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाचा विषय हा विधान परिषदेच्या पटलावर घेण्यात आला होता. या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

Updated : 29 Jun 2024 3:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top