महाविकास आघाडीने प्रतिसाद दिला नाही तर स्वबळावर लढणार - प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेे यांनी भेट घेतली. महाविकास आघाडीने प्रतिसाद दिला नाही तर स्वबळावर लढणार असे प्रकाश आंबेडकर का म्हणाले. परंतू ठाकरे गट यांच्यासोबत युती करणार का या प्रश्नांबाबत प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
X
• राज्याच्या राजकारणात ठाकरे ग़ट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीच्या चर्चा रंगल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या 'राजगृह' येथे त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. परंतू ही भेट इंदू मिलच्य जागी बाबासाहेब आंबेडकर यांच्या उभ्या राहणाऱ्या स्मारकाबदद्ल होती अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. भाजप किंवा शिंदे गटासोबत येत्या काळात युती करणार का? या पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले "भाजप सोबत युती करणार नाही. तसेच भाजपसोबत जे कोणी जातील त्यांना त्यांच्यासोबत न जाण्याचा सल्ला देण्यात येईल.तसेच शिंदे गटासोबत युती करण्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला.महाविकास आघाडीतील काही वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा केली आहे.
महाविकास आघाडीत वंचीत बहुजन आघाडीचा काही समावेश आहे का? जर असेल तर त्याचा आराखडा कसा असेल, अशी विचारणा केली होती. असे स्पष्टीकरण देऊन प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली."ठाकरे गटाच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी सष्टीकरण दिले – "प्रबोधनकार आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध जवळचे होते. त्यामुळे प्रबोधनकार पोर्टलसाठी उद्धव ठाकरे यांनी मला निमंत्रण दिल्याने मी होकार दिला. तसेच युतीच्या प्रश्नांबाबत महाविकास आघाडीने काहीच प्रतिसाद दिला नाही तर आम्ही स्वबळावर लढणार." ठाकरे गटाच्या युतीबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत स्पष्ट केले.