पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मधील 5 महत्त्वाचे मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मधील 5 महत्त्वाचे मुद्दे
X
"दिल्लीत २६ जानेवारी ला तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला." असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. २६ जानेवारीला शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये तीन कृषी कायद्याचा विरोध म्हणून आंदोलन केले होते. या आंदोलनात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काही लोकांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर देखील चढाई केली होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमात आपलं मत व्यक्त केलं आहे.
मोदींच्या भाषणातील 05 मुद्दे
भारत जगात सर्वात मोठा कोव्हिड वॅक्सिन प्रोग्राम चालवणार देश आहे. भारतात फक्त 15 दिवसात 30 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली.
अमेरिकेसारख्या विकसित देशाला हेच काम करण्यास 18 दिवस लागले, तर ब्रिटेनला 36 दिवस
मेड इन इंडिया लस आज भारताच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे. कोरोना च्य़ा विरोधातील लड़ाई ला जवळ जवळ एक वर्ष पूर्ण...
26 जानेवारीला तिरंग्याचा झालेल्या अपमानाने देश दु:खी झाला...
शेती क्षेत्रात आधुनिकीकरण करण्यासाठी सरकार दृढ़ संकल्पित आहे आणि यासाठी अनेक पावलं सरकारने उचलली आहेत. प्रयत्न सुरू आहेत.