अर्णबचं उध्दव ठाकरेंना आव्हान, स्टुडीयोत जय महाराष्ट्र ची घोषणाबाजी
X
रिपब्लिक टीव्ही चा संपादक अर्णब गोस्वामी ने सुटका झाल्यानंतर रिपब्लिक टीव्हीच्या स्टुडीयोत जय महाराष्ट्र- भारत माता की नारेबाजी करत देशातील सर्व भाषांमध्ये टीव्ही चॅनेल लाँच करायची घोषणा केली. लवकरच म्हणजे येत्या १६ महिन्यांत रिपब्लिक ची मराठी वाहिनीही येण्याची शक्यता असून तसे संकेत अर्णब गोस्वामी ने आपल्या न्यूजरूम भाषणाचा शेवट मराठीत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानून केेले.
उध्दव ठाकरेंनी मला घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण मी या घटनेनंतर अधिक जोमाने काम करणार असून मला गमावण्यासारखं काही नाही, पण उध्दव ठाकरें कडे मात्र आहे असं म्हणत अर्णब गोस्वामी ने आपण कॉमनवेल्थ आणि आदर्श स्कॅम काढला तेव्हा उध्दव ठाकरे कुठे होते असा सवाल विचारला आहे, घरात घुसून अनधिकृतरित्या अटक करून घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उध्दव ठाकरेंना माझी टीम उत्तर देईल असं ही अर्णब याने सांगीतलं.