संभाजी भिडेने केला राष्ट्रध्वजाचा अपमान, पहा ध्वजसंहितेत काय आहे शिक्षा?
X
संभाजी भिडे याने भारताच्या राष्ट्रध्वजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविषयी कारवाई कधी केली जाणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यानंतर नेमकी काय शिक्षेची तरतूद आहे? याचीही चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रीय गौरव अपमान निवारण संशोधन 2003 नुसार राष्ट्रध्वजाचा, संविधानाचा आणि राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान केल्यास कठोर कारवाई करण्यात येते.
राष्ट्रध्वज आणि संविधानाचा अपमान म्हणजे काय?
भारतात कुठल्याही व्यक्तीने देशाचा राष्ट्रध्वज आणि संविधान जाळण्याचा प्रयत्न केल्यास, राष्ट्रीय प्रतिकं विकृत केल्यास, दूषित केल्यास, फाडल्यास किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे किंवा राष्ट्रध्वजाबाबत अपमानकारक टिपण्णी करणे किंवा लिहीणे याला राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान मानला जातो.
काय आहे शिक्षेची तरतूद?
भारतीय नागरिकांना घटनेने काही हक्क दिले आहेत. त्याबरोबरच काही कर्तव्यही सांगितले आहेत. त्यासंदर्भात प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर एक्ट 1971 अंतर्गत संविधान किंवा राष्ट्रध्वजाचा अपमान करणे दंडनीय गुन्हा असल्याचे म्हटले आहे. या कायद्यांतर्गत संबंधित कृत्य करणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा किंवा दंड अशा शिक्षा होऊ शकतात. यामध्ये शिक्षेसह दंड भरण्याचा आदेशही दिला जाऊ शकतो.
राष्ट्रीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान कायदा 1971 नुसार संभाजी भिडे याने राष्ट्रध्वजाबद्दल अपमानकारक टिपण्णी केली आहे. त्यामुळे संभाजी भिडेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देशप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.