Home > News Update > चोवीस तासाच्या आत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षांवर दुसरा गुन्हा दाखल

चोवीस तासाच्या आत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षांवर दुसरा गुन्हा दाखल

चोवीस तासाच्या आत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षांवर दुसरा गुन्हा दाखल
X

अहमदनगर एमआयडीसीतील आयटी पार्कला भेट देत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर आरोप करणारे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर चोवीस तासाच्या आत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत पीडित महिलेच्या नावाचा उल्लेख करून महिलेची बदनामी केल्याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आयटी पार्कमध्ये बळजबरीने घुसत येथील महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून, लज्जा उत्पन्न होईलअसे वर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसचे किरण काळे यांच्यावर अहमदनगर एमआयडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत खुलासा करण्यासाठी किरण काळे यांनी पत्रकार परिषदत घेतली. या पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनीधींसमोर त्यांच्यावर दाखल झालेली फिर्याद वाचून दाखवताना काळे यांनी पीडित महिलेचे नाव घेतले. विशेष म्हणजे यावेळी ही पत्रकार परिषदत अनेक स्थानिक वाहिन्यांवर थेट प्रसारित होत होती. त्यामुळे संबंधित पीडित महिलेची ओळख उघड झाल्याने संबंधित महिलेने तोफखाना पोलिसात हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पत्रकार परिषदेत चित्रफीत दाखवत केला खुलासा

दरम्यान किरण काळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी पत्रकारांना एक चित्रफीत दाखवली ज्यात त्यांनी संबंधित आयटी पार्क मध्ये गेल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांसोबत सौदार्यपूर्ण चर्चा झाल्याचे दाखवले. त्याठिकाणी त्यांनी स्वतः आणि त्यांच्यासोबत असलेल्या कोणत्याही काँग्रेस कार्यकर्त्यांनी कुणाशीही गैरवर्तन केले असल्याचे त्यांनी सांगितले सोबतच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी संबंधित महिला कर्मचारी आणि पोलीस प्रशासनावर दबाव टाकून आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पडल्याचा आरोप केला. यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांना आयटी पार्कमध्ये कोणते विभाग येतात याचीही माहिती नसल्याचे म्हणत त्यांनी त्याच आयटी पार्क मध्ये समोर बसावे आणि चर्चा करावी असे आव्हान दिले. मात्र ही चर्चा इंग्रजी मध्ये केली जाईल अशी अट घालत त्यांनी आमदार जगताप यांना चिमटा काढला.

हा केवळ मीडियात झळकण्यासाठीचा प्रयत्न- जगताप

दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील पत्रकार परिषद घेत किरण काळे यांना प्रत्युत्तर दिले आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून शहराचा विकास व्हावा येथील युवकांना रोजगार मिळावा म्हणून आम्ही आयटी पार्कचे वृक्ष लावले आहे, त्याचे वटवृक्षात रुपांतर होत असताना अशा पद्धतीने कुणी तेथे जाऊन गैरवर्तन करत असेल आणि विकस कामात खोडा घालत असेल तर ते आम्ही खपवुन घेणार नाही असं म्हणत आपण कुणावरही दवाब टाकलेला नाही. केवळ मीडियामध्ये झळकण्यासाठी संबंधित व्यक्तीची धडपड सुरु असल्याचा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्रित असताना अशा पध्दतीने स्थानिक पातळीवर संघर्ष होत असल्याने आपण याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, आपण संबंधित व्यक्तीला आणि त्यांच्या आरोपांना महत्व देत नसल्याचे आमदार जगताप यांनी म्हटले आहे.

Updated : 3 Sept 2021 7:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top