Home > Max Woman > Woman's Day : पोलिस आयुक्तांचे महिला दिनानिमीत्त महिला पोलिसांना गिफ्ट

Woman's Day : पोलिस आयुक्तांचे महिला दिनानिमीत्त महिला पोलिसांना गिफ्ट

8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन. यानिमीत्त मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी महिलांसाठी अनोखे गिफ्ट दिले आहे.

Womans Day : पोलिस आयुक्तांचे महिला दिनानिमीत्त महिला पोलिसांना गिफ्ट
X

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुरक्षेसाठी पोलिसांना सतर्क रहावे लागते. त्यामुळे मुंबई पोलिसांवर कामाचा ताण असतो. त्यातच महिला पोलिसांना एकीकडे कुटूंब तर दुसरीकडे नोकरी यामुळे दुहेरी कसरत करावी लागते. मात्र मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी महिला दिनाच्या पुर्वसंधेला महिलांसाठी अनोखे गिफ्ट दिले आहे.

मुंबईच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस सतर्क असतात. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कायम हाय अलर्टवर असलेल्या मुंबई पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण असतो. त्यातच पोलिसांच्या कामाचे कागदोपत्री 12 तास आहेत. मात्र पोलिसांना 16 तासांपेक्षा अधिक वेळ काम करावे लागते. तर महिला पोलिसांना एकीकडे कुटूंब तर दुसरीकडे नोकरी अशी दुहेरी कसरत करावी लागते. त्यामुळे महिला पोलिसांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परीणाम होतो. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारे परीणाम टाळण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी महिला पोलिसांसाठी 8 तास ड्युटीचे आदेश जारी केले आहेत.

राज्यातील इतर सरकारी अस्थापनांप्रमाणे पोलिसांसाठी कामाचे 8 तास करण्याबाबत देवनार पोलिस स्टेशनचे रविंद्र पाटील यांनी तात्कालिन पोलिस आयुक्त दत्ता पडसगीकर यांना प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देत देवनार पोलिस ठाण्यात हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे 2017 पासून मुंबईतील सर्व ठिकाणी हा प्रस्ताव लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र संजय पांडे पोलिस महासंचालक असताना त्यांनी पोलिसांना 8 तास ड्युटीचे आदेश दिले होते. मात्र त्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे तो आदेश पडून होता. मात्र संजय पांडे यांनी मुंबईचे पोलिस संचालक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर संजय पांडे वेगाने निर्णय घेत आहेत. त्यातच महिला पोलिसांसाठी महत्वाचा असलेला कामाचे 8 तास करण्याचा आदेश पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी घेतला आहे. तर महिला दिनाच्या निमीत्ताने पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी महिला पोलिसांना आठ तास ड्युटीचे आदेश जारी केले आहे. त्यामुळे महिला पोलिसांमधून संजय पांडे यांचे कौतूक होत आहे.

या आदेशानंतर महिला पोलिसांना आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. त्यामुळे या आदेशाचे महिला पोलिसांकडून कौतूक करण्यात येत आहे

Updated : 8 March 2022 7:58 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top