Antilia bomb scare case: भाजप महाराष्ट्राला बदनाम करत आहे: नाना पटोले
X
अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या एका स्कॉर्पिओत स्फोटक आढळली होती. त्यानंतर या सर्व प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. यावर आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधक खोटे आरोप करून महाराष्ट्रला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सचिन वाझे प्रकरणी खलनायक करण्याचे काम भाजपाकडून सुरू आहे. डबल ढोलकी वाजवण्याची भाजपाचा सुरू आहे. देशात महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. सचिन वाझेंना खलनायक बनविण्याचे काम विरोधक करत आहेत, असं सांगतानाच तपास यंत्रणानी नार्को टेस्ट करायची असेल तर करू द्यावी. असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.
25 फेब्रुवारीला अंबानीच्या घराबाहेर एक स्कॉर्पिओ आढळली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. मात्र, ज्या मनसुख हिरेन यांची ही गाडी होती. त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत आढळला होता. त्यानंतर या सर्व प्रकरणाचा तपास करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांचे संबंध असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
तसंच हिरेन यांच्या पत्नीने देखील सचिन वाझे यांनी त्यांच्या पतीचा खून केला असा आरोप केला होता. त्यानंतर एनआयए ने सचिन वाझेला अटक केली आहे. त्यानंतर आता राजकीय वातावरण तापलं आहे.