Home > मॅक्स वूमन > 'त्या' रत्तबंबाळ माणसाला दुचाकीवरून नेणाऱ्या एका पुणेकर तरुणीचा अनुभव

'त्या' रत्तबंबाळ माणसाला दुचाकीवरून नेणाऱ्या एका पुणेकर तरुणीचा अनुभव

त्या रत्तबंबाळ माणसाला दुचाकीवरून नेणाऱ्या एका पुणेकर तरुणीचा अनुभव
X

"रक्ताळलेला माणूस माझ्या दुचाकीवर नेताना तो केव्हाही मागच्या मागे पडेल म्हणून चक्क मी कधी नव्हे स्टोलनी त्याला आणि मला बांधून ससूनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला"

त्याच्या डोक्यावरच होर्डिंग्जचा एक मोठा लोखंडी तुकडा अडकलेला रक्तबंबाळ झालेला माणूस पळत पळत ससूनच्या दिशेने गाड्यांना थांबवून स्वतःसाठी लिफ्ट मागत होता पण त्याला कुणी लिफ्ट देत नव्हतं, शेवटी मीच माझ्या दुचाकीवर स्टोलने बांधून त्याला ससून रुग्णालयाकडे घेऊन निघाले" प्रादेशिक परिवहनकडून जुन्या बाजाराकडे येणाऱ्या रस्त्यावरील चौकात एका खासगी कंपनीचे होर्डिंग कोसळून चौघांचा मृत्यू झाला. अनधिकृतपणे हे रेल्वेच्या जागेत उभारण्यात आले होते. होर्डिंग काढण्याचे काम सुरू असताना अचानक ते कोसळले. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथून समोरच्या सिग्नलवर सामाजिक कार्यकर्त्या गायत्री पाठक उभ्या होत्या. त्यांनी एका जखमी व्यक्तीला आपल्या दुचाकीवर लिफ्ट देऊन ससून रुग्णालयाकडे नेण्याचा थरारक अनुभवला.

"आज दुपारी ससूनच्या अलीकडच्या चौकात झालेल्या मोठ्या अपघाताचा अखोदेखा हाल पाहिला. ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा मी समोरच्या सिंग्नलाल उभी होती. मी माझ्या खासगी कामानिमित्ताने ससून रुग्णालयाकडून जाणार होते. त्यावेळी समोर काय घडले याचा अंदाजा येत नव्हता. तितक्यात होर्डिंग्जचा एक मोठा तुकडा डोक्यावर अडकलेला माणूस पळत पळत ससूनच्या दिशेने गाड्यांना थांबवून स्वतः साठी लिफ्ट मागत होता. पण त्याला कुणी लिफ्ट देत नव्हतं. मी हिंमत करून त्याला माझ्या दुचाकीवर बसवलं आणि ससून रुग्णालयाकडे निघाले.

रक्ताळलेला माणूस माझ्या दुचाकीवर नेताना तो केव्हाही मागच्या मागे पडेल म्हणून चक्क मी कधी नव्हे स्टोलनी त्याला आणि मला बांधून ससूनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. तो माणूस पडणार असं वाटत असतानाच वाटेत पोलिसाला अडवले.

तो पोलीस यायलाच तयार नव्हता. त्याला वाटलं माझ्या दुचाकीने अपघात झाला असावा आणि जखमी व्यक्तीला मी रुग्णालयात घेऊन जात आहे. शेवटी 2 मिनिटांत झालेल्या माझ्या बाचाचीत त्याला दमदाटी करून पोलीस मी आणि तो माणूस असं ट्रीपल सीट घेऊन ससूनमध्ये पोहचवण्याचा प्रयत्न केला.

पण गंमत म्हणजे, पोलिसाला त्याच्या युनिफॉर्मची काळजी. रक्ताळलेल्या डोक्यावरच रक्त आपल्या युनिफॉर्मवर सांडू नये म्हणून ससून 2 मिनिटाच्या अंतरावर असतानाही त्याने लगेच रिक्षाला थांबवले आणि त्याला रुग्णालयात नेलं. पुढची प्रगती मला माहित नाही. मी आपलं माझ्या ड्रेसला मागे लागलेल्या रक्ताचे डाग घेऊन आयुक्त कार्यालयात पोहचले.

काम निपटून तशाच ड्रेसमध्ये घरी आले. आल्यानंतर ड्रेस पूर्णपणे खराब झाल्याचे लक्षात आले. विशेषतः आयुक्तांशी बोलताना पाठीवर घाम असेल म्हणून फार लक्ष दिले नाही आणि समोरच्यांनाही काही लक्षात आले नाही. आज कळलं सिग्नलची लोकं माझ्याकडे अशी का पहात होती. 'आपल्याच नादात असणे ' याचा प्रत्यय आज आला." -गायत्री पाठक.

Updated : 6 Oct 2018 4:37 PM IST
Next Story
Share it
Top