Home > मॅक्स वूमन > …तर हार्ट अटॅक फिक्स!

…तर हार्ट अटॅक फिक्स!

…तर हार्ट अटॅक फिक्स!
X

सतत धावपळ आणि धकाधकीच्या आयुष्यामुळे आपल्या जीवनात निवांतपणा, स्थेर्य राहिले नाही. याचा दुष्परिणाम म्हणून आजच्या वर्किंग क्लास मध्ये डिप्रेशनचं प्रमाण खूप वाढले आहे. विशेषतः नोकरी करणारा महिलावर्ग कामाच्या अतिताणामुळे डिप्रेशनच्या शिकार होत आहेत. पण ही समस्या इथेच थांबत नाही या सततच्या डिप्रेशन मुळे हृदयावर परिणाम होऊन, महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे.

जॉन्स हॉपकिन्स बेव्हिव मेडिकल सेंटरचे उपसंचालक, तसेच मेडिसिन विभागाचे उपाध्यक्ष प्रोफेसर Dr. Roy C. Ziegelstein यांनी डिप्रेशन आणि हृदयासंबंधीचे आजार असलेल्या रुग्णांचा विशेष अभ्यास केला. या अभ्यासावरून त्यांना असं लक्षात आलं की, डिप्रेशन आणि हृदयासंबंधीच्या आजारांचा घनिष्ठ संबंध आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हार्टअटॅक होतो आणि ती व्यक्ती रिकव्हर होत असते, तेव्हा त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडून ती डिप्रेशन मध्ये जाण्याची संभवता जास्त असते. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती डिप्रेशन मधून जात असते तेव्हा तिची मानसिक स्थिती खूप ढासळलेली असते आणि या अवस्थेत हृदयासंबंधीचे आजार होण्याची संभावना जास्त असते. एका संशोधनानुसार हार्ट अटॅक येणारे ३३% रुग्ण हे डिप्रेशचे शिकार असतात.

डॉ. शॅरॉने एन. हायेस या अमेरिकेच्या मायो क्लिनिक मधील वूमन हार्ट क्लिनिकच्या संचालक आहेत. त्यांच्या म्हणण आहे की कार्डियाक केअर मधील एकूण रुग्णांपैकी २५% रुग्ण हे नैराश्यग्रस्त असतात. त्यांतील ५०% रुग्णांमध्ये सौम्य नैराश्याची लक्षणे दिसून आली आहेत असं त्या सांगतात. डॉ.शॅरॉने यांच्यामते, अमेरिकेतील १८% महिला डिप्रेशनच्या शिकार आहेत. अमेरिकेत पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण दुप्पट आहे आणि हार्ट अटॅक मुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही जास्त आहे.

महिला नोकरदारावर कामाचा अत्याधिक ताण असतो. सततची चिंता आणि वेगवेगळे ताणतणाव यामुळे त्यांच्यात स्ट्रेस हार्मोन्स, कॉर्टीसोल आणि ग्लुकोसचं प्रमाण वाढतं. आणि ब्लड प्रेशर वाढून हार्ट अटॅकची संभवना वाढते.

यातून बाहेर यायचं असेल तर, आधी तुम्हाला ही समस्या ओळखता आली पाहिजे. पुढील काही लक्षणांच्या आधारे तुम्हाला त्याचा अंदाज येऊ शकतो

१. छातीमध्ये वेदना होणे

२. खांदा, जबडा, मान आणि हात यामध्ये वेदना होणे

३. धाप लागणे

४. थकल्यासारखे वाटणे, भोवळ येणे

५. खूप चिंता वाटणे

६. उलटी आल्यासारखे वाटणे

७. घाम येणे

ही काही लक्षण तुम्हाला दिसून येत असतील तर लगेच घाबरून जाऊ नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. शिवाय स्वतः काही उपाय सुद्धा करता येतील जसं

१. धूम्रपान करत असाल तर ते बंद करा

२. वजन कमी करा

३. नियमित व्यायाम करा

४. मेडिटेशन आणि योगा नियमितपने करा

५. ताजी फळे, भाजी आणि फायबर युक्त आहार घ्या

६. अल्कोहोलचे सेवन टाळा

७. ताण कमी घेण्याचा प्रयत्न करा

आनंदी आणि तणावरहित जगणे हा अनेक समस्यांवरचा उपाय होऊ शकतो. त्यामुळे प्रयत्नपूर्वक आपण आनंदी राहिले पाहिजे. डिप्रेशन किंवा ताण आल्यासारखा वाटत असेल तर मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला ज्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो त्या करा. थोडा वेळ फक्त स्वतःसाठी काढा, आणि स्वतःसाठी जागा, स्वतःच्या आवडीनिवडी जपा. नक्कीच तुमचा ताण आणि टेन्शन कमी होईल. आणि तुम्ही डिप्रेशन आणि हृदयविकारासारख्या समस्यांपासून दूर रहाल.

संजिवनी तबीब, हैदराबाद

Updated : 5 May 2017 12:44 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top