Home > मॅक्स वूमन > महिलेनेच महिलेसोबत केला लैंगिक अत्याचार?

महिलेनेच महिलेसोबत केला लैंगिक अत्याचार?

महिलेनेच महिलेसोबत केला लैंगिक अत्याचार?
X

सध्या तनुश्रीने केलेल्या आरोपामुळे सुरु असलेल्या प्रकरणात आता #Metoo ह्या मोहिमेचा हातभार लागला आहे. या चळवळीत अनेक अत्याचाराचे अनुभव महिला शेअर करत आहेत. यात जास्त सहभाग हा प्रसिद्ध महिलांचा आहे. या चळवळीतील एक धक्कादायक प्रकार म्हणजे यामध्ये आता महिला समलैंगिक प्रकरण समोर आले आहे.

एका महिला कॉमेडियनने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन पोस्ट करुन तिच्यावर दुसर्या एका कॉमेडियन महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. ज्या कॉमेडियनने असे ट्विट केले आहे, त्या कॉमेडियनचे नाव कनीज सुरका असे असून तिने आदिती मित्तल या कॉमेडीयनवर अत्याचाराचा आरोप केला आहे. दोन वर्षांपूर्वी अंधेरी बेसवरील एका शो दरम्यान हा प्रकार घडल्याचे तिने सांगितले.

https://twitter.com/kaneezsurka/status/1050000796560056320

कनीजने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, दोन वर्षाआधी अंधेरी बेसवर जवळजवळ १०० प्रेक्षकांसमोर आणि काही कॉममेडियन्समोर एक कॉमेडी शो मी करत होती. तेव्हा अचानाक आदिती मित्तल जागेवरून उठून माझ्या जागी आली आणि माझी इच्छा नसताना मला जबरदस्ती किस केला. यावेळी आदितीने माझ्या तोंडात आपली जिभ लावली. ही वेळ माझ्यासाठी खूप लाजीरवाणी होती. प्रत्येक व्यक्तीसाठी आपली आवड आणि त्याला काही बंधनं आहेत, पण माझ्या प्रकरणात आदितीने हे सर्व तोडून मोडून लावल्यासारखं आहे. आदिती मित्तलवर #MeToo चळवळीत आवाज उठवल्याने आपल्याला हिरो म्हटलं जात आहे, ते मला अधिक सतावणारं आहे. मी आमच्या एका संयुक्त मित्राकडून याबाबतीत त्यांना याप्रकरणी माफी मागण्यास सांगितलं, पण त्यांनी पुन्हा एकदा तपासून पाहा, अस सांगत ही मागणी झुगारून लावली. माझ्याकडे पुरावे आहेत, लोक पीडितावर विश्वास करतात. आदितीने जे केलं ते त्रासदायक आहे, यामुळे मला हे पाऊल उचलावं लागत आहे, पण जर ती माझी जाहीर माफी मागत असेल तर मी हे इथेच विसरून जाईन.

Updated : 11 Oct 2018 7:03 PM IST
Next Story
Share it
Top