...पुन्हा शबरीमालामध्ये महिलेची एन्ट्री!
X
सध्या केरळच्या शबरीमाला मंदिराचा वाद चांगलाच पेटला आहे. हल्लीच या मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्याने नवा वाद सुरु झाला होता. हा वाद शांत होतोय ना होतोय तो पर्यंत आता आणखी एका महिलेने मंदिरात प्रवेश केल्यानं ह्या वादाला नवी कलाटणी आली आहे. ही महिला मुळची श्रीलंकेची असून तिचे नाव शशिकला आहे. या महिलेने आज मंदिरात प्रवेश करुन दर्शन घेतले व पूजा देखील केली. परंतू यावेळी शशिकला यांनी भक्तांनी विरोध केलेला नसतानाही पोलिसांनी मला माघारी पाठवले असा आरोप केला आहे. शशिकलाने भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतल्याचा दावा सरकारनेच केला आहे. याबाबतचे सीसीटिव्ही फुटेजदेखील पोलीसांनी प्रसारीत केले आहे, ज्यामध्ये शशिकला यांनी भगवान अयप्पांच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्याचे दिसत आहे. गाभाऱ्यात पोहचण्यासाठी ही महिला पवित्र 18 पायऱ्या चढली की नाही हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. शशिकला या आपल्या पती व मुलासह दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांच्या पतीने सांगितले की मी आणि माझ्या मुलाने फक्त दर्शन घेतले व शशिकला यांनी देखील आपल्याला मंदिरात प्रार्थना करु न दिल्याचा दावा केला आहे. याआधी बिंदू आणि कनकदुर्गा या दोन महिलांनी शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.