Home > मॅक्स वूमन > महिला आरक्षण का हवे?

महिला आरक्षण का हवे?

महिला आरक्षण का हवे?
X

गुरुवारी (२७-डिसेंबर) लोकसभेत ट्रिपल तलाक प्रतिबंधक विधेयका वर चर्चा होऊन लोकसभेत हे विधेयक समंत करण्यात आले. यावर झालेल्या चर्चेत अनेक मुद्दे मांडण्यात आले मात्र या सर्वांत लक्षवेधी ठरले ते स्मृती ईराणी व सुप्रिया सुळे या दोघींची भाषणे या भाषणातून ज्या दमदार पद्धतीने महिलांचे मुद्दे समोर आले. त्या वरुन महिला लोकप्रतिनीधींची गरज का आहे याचे उत्तरच मिळाले. स्मृती ईराणी नेहमीच भावनांना आवाहन करत आपले मत मांडतात त्याच प्रमाणे ट्रिपल तलाक प्रतिबंध करणे का गरजेचे आहे व त्यामुळे महिलांच्या अधिकाराचे संरक्षण कसे होणार यावर त्या बोलत राहिल्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी तर महिला सक्षमीकरणासाठी नक्की काय काय आवश्यक आहे याचेही चित्र मांडले, महिला कुठल्या परिस्थिती कसा निर्णय घेतात व तो घेण्यासाठी त्यांचा प्राधान्यक्रमही कसा असतो हे ही त्यांनी समजावून सांगितले या बरोबरच महिला या किती पावरबाज असतात यावरही प्रकाश टाकला. काॅंग्रेसच्या रंजिता यांनी महिला मग ती कुठल्या जाती धर्मांची असो तिच्या अधिकाराचे संरक्षण कसे झाले पाहिजे यावर प्रकाश टाकला. हे सर्व मुद्दे ज्या सभागृहात चालले होते त्याच्या मुख्यपदिही सुमित्रा महाजन होत्या हे चित्र जरी खूप सकारात्मक वाटत असले तरी महिलांचे मुद्दे ताकदिने मांडण्यासाठी महिला लोकप्रतिनीधींची किती आवश्यकता आहे हे पुन्हा समोर आले. आता ट्रिपल तलाक प्रतिबंध विधेयका पाठोपाठ महिला रिझर्वेशनचे विधेयक सभागृहात लवकरात लवकर मांडण्यात यावे अशी आशा करायला हवी.

Updated : 28 Dec 2018 3:41 PM IST
Next Story
Share it
Top