Home > मॅक्स वूमन > बा..ई...प...ण ( भाग ५ )

बा..ई...प...ण ( भाग ५ )

बा..ई...प...ण ( भाग ५ )
X

मनुष्य पृथ्वीवर जन्माला येतो , जगतो व मरुन जातो. जन्म ते मरण यांमध्ये असते ते जीवन . हे जीवन कोणत्या प्रकारचे वाट्याला येते यावर समाधान अवलंबून आसते. जन्माला आल्यावर आपण अवतीभवती पाहतो ते आपल्या सारखेच हाडामांसाचे आणखी कोट्यावधी गोळे. हालचाल करणारे . त्या हालचालीने आपल्या जीवनात देखील बराच फरक पडत असतो. या हालचालीला ढोबळपणे मानवी वर्तन संबोधूया. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर काही वेगळे अनुभव येत जातात...

शिकवण अर्थात संस्कार ...ह्या नावाखाली बरेच चांगले व वाईट कृती घडत असतात. ज्या निसर्गाने स्त्री पुरुष जन्माला घातले त्याने मानववांशाची पुढील पिढी अवतरावी याकरिता काही शारीरिक बदल केले. स्त्रीला योनी दिली , पुरुषाला लिंग. या मिलनातून नवा जीव जन्माला आला. हे " नैसर्गिक अलगपण " आवश्यक होतेच यात वाद नाही . परंतु मुलगा अथवा मुलगी यांच्या वाढ होताना त्यांच्यात स्त्री पुरुष भेद अधिकाधिक ठळक करणारे व्यवहार मात्र मनाला खटकतात. मुलगी म्हटल की तिला बाहुली द्यायची अन् मुलगा म्हटला की त्याला वेगवेगळ्या पराक्रम गाजवणारी हत्यारे . मुलगीला लहानपणापासून शिकवण आसते की तिने " स्वैपाक स्वैपाक " खेळत रहायचे आणि मुलाने विटीदांडू भिरकवायचा. गल्लीत उभा राहून शिव्या देणारा बालक मनाला कमी खटकेल परंतु शिव्या देणारी मुलगी मात्र अजिबात चालत नाही . रस्त्यावर मुलगी पाहून शीळ घालणारे रोमिओ चालतात पण एखाद्या मुलीने शीळ घातली तर तोबा गहजब माजतो. संस्कार नावाखाली मुलीने घरची धुणी भांडी करावीत , झाडलोट करावे परंतु घरचा मुलगा चुकून हे करु लागलाच तर त्याला या " बायकी " कामापासून हटवायचे. अगदी घरातील लहान बाळाने शी केली तरी घरच्या मुलीनेच ते आवरायचे , मुलाने नाही हा संस्कार रुढ आहे. मुलांचे अंतवस्त्रे कुठही वाळत घालू शकतो , मात्र मुलींचे कुणाला दिसणार नाहीत अशा ठिकाणी सुकवावे लागतात. ...गोष्टी छोट्या आसतात परंतु विषमता अथवा आलगपण हळूहळू वाढवत नेणारी असतात. दंगल चित्रपट पाहताना अभिमान वाटतो पण घरी आपली मुलगी मी कुस्ती शिकणारय आस बोलली तर कानाखाली दोन,आवाज काढाले जातील ही वस्तुस्थिती आहे. मुलामुलीच्या वाढीच्या वयातच समाजाने त्यांच्या मध्ये असमानतेचे व्यवहार मिसळून टाकलेले आसतात. मानवी जीवनाचा हजारो वर्षाचा इतिहास याला साक्ष आहे. हे असमानतेचे चित्र बदलणार कधी ? विचार व्हावा.

माणसांनो...लहान मुलं वाढत असतानाच त्याच्या वर केले जाणारे संस्कार दिर्घकाळ टिकत असतात.आपल्या घरी मुलगा असतो तशीच मुलगीही असते. त्या दोघांना समान पध्दतीने , समान व्यवहाराने जगायचे संस्कार दिले तर ? ..निश्चितच योग्य होईल. घरची कामे करणारा मुलगा अथवा फुटबाँल खेळणारी मुलगी हे चित्र अपवादात्मक दिसू नये. हे चित्र नाँर्मल व्हावे अशी समाजरचना करणे हाच विवेकीपणा असतो. अशा विवेकी समाजात मुलगा व मुलगी यांच्यातील नैसर्गिक भेद समजून घेऊन मानवनिर्मित भेद कमी करत जाणे हेच श्रेयस्कर होय.

!! मुलगा मुलगी एकसमान...हे व्यवहारात उतरु द्या !!

Updated : 1 Nov 2018 8:13 PM IST
Next Story
Share it
Top