Home > मॅक्स वूमन > ती का झाली टॉपलेस?

ती का झाली टॉपलेस?

ती का झाली टॉपलेस?
X

स्तनांना स्पर्श करा..

हा संदेश देण्यासाठी ती चक्क टॉपलेस झाली. आज तिच्या एकेक कपड्यावर आणि फॅशनवर कोट्यवधी रूपये खर्च करण्यासाठी विविध ब्रँड तयार असतात, मात्र 'ती'ने एका वेगळ्या कारणासाठी टॉपलेस व्हायचा निर्णय घेतला.

ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती म्हणून राबवला जात आहे. यासाठी टेनिस स्टार सेरेनाने विलियम्स हिने देखील पुढाकार घेतला आहे. यासाठी सेरेनाने तिच्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड केले असून या गाण्याच्या व्हिडीओमध्ये सेरेना टॉपलेस झाली आहे. ‘आय टच मायसेल्फ’ असे त्या गाण्याचे बोल आहेत.

या व्हिडीओमध्ये ती स्वतःच्या स्तनांना स्पर्श करत इतर महिलांना स्वतःच्या स्तनांना स्पर्श करण्याचे आवाहन करत आहे.

सध्या जगभरात ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यासाठी जगभरात जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणुन टेनिसपटू सेरेनाने पुढाकार घेत हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सेरेनाच्या या जनजागृतीचे नेटिझन्सनी कौतूक देखिल केले आहे.

https://www.instagram.com/p/BoUJN25na2Y/?taken-by=serenawilliams

Updated : 30 Sept 2018 10:26 PM IST
Next Story
Share it
Top