स्मृती इराणी का देतायत ट्रिपल तलाकला पाठिंबा?
X
गुरुवारी लोकसभेत तिहेरी प्रतिबंधक तलाक विधेयक मंजूर झाला मात्र यावेळी केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री स्मृति इराणी यांनी यावर भाष्य केलं. त्यावर बोलत असतांना त्यांनी लग्न जर सहमती नुसार होत असेल तर विभक्त होतानाही सहमतीची आवश्यकता कशी आहे यावर भाष्य केले. अत्यंत वक्तृत्व संपन्न असे भाषण इराणी यांनी केले. मात्र ट्रिपल तलाक वर बोलत असताना स्मृती इराणी सबरीमालावर केलेले वक्तव्य मात्र विसरल्या. सबरीमाला प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या.
प्रत्येक धर्मात काही नियम आहेत. देवाची प्रार्थना करायची असेल तर त्या धर्माचा आदर करून करता येते. सबरीमाला विषयाला राजकीय रंग दिला जातोय. इराणी यांच्या वक्तव्यानंतर हिंदू धर्मातील कुप्रथे बद्दल कुठलेही भाष्य करणे त्यांनी टाळले आणि एका अर्थी त्यांनी त्याचे समर्थनच केले मात्र मुस्लिम धर्मातील कुप्रथेबद्दल बोलताना त्यांना एकदम महिलांची वाईट स्थिती असमानता दिसली. सबरीमाला मंदिरप्रकरणी वेगळं मत तर ट्रिपल तलाक बाबत वेगळं मत असं का असा प्रश्न होऊ लागला आहे. स्मृति इराणी या स्वतः एक महिला आहे मात्र त्यांना मुस्लीम महिलांचा जसा कळवळा येतोय तसा हिंदू महिलांचा का येत नाही. जसं सबरीमाला प्रकरण हा हिंदूंचा धार्मिक मुद्दा आहे तर ट्रिपल तलाकही मुस्लिम धर्माचा धार्मिक मुद्दा होत नाही का?. मात्र धर्मानुसार कुप्रथेबद्दल मत इराणी व्यक्त करत असल्याने नक्की इराणी यांच्या ट्रिपल तलाक ला पाठिंबा देण्याच्या हेतुबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.