आधी झालेल्या आजारावर आता औषध का घेत आहेत ?- विजया रहाटकर
Max Maharashtra | 15 Oct 2018 7:45 PM IST
X
X
भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आता #Metoo बाबत आपले मत व्यक्त केले आहे.
त्या याविषयी म्हणाल्या की, "#Metoo बाबत जे सध्या आपल्यावरील वाईट घडलेला प्रकार जाहिर करीत आहेत त्यांनी हे पाऊल आधीच उचलायला हवे होते. इतक्या उशिरा त्यांनी हे प्रकार समोर आणण्यापेक्षा जर या आधीच त्यांनी आवाज उठवला असता तर बरे झाले असते. स्त्री - पुरुष दोघेही एकत्र आल्याशिवाय समाज चालू शकत नाही. जर तुम्हाला त्रास खुप वर्षांपूर्वी आजार झाला तर औषध आता का घेत आहात? जर कोणासोबत काही चुकीचे घडत असेल तर ती व्यक्ती त्याबाबत आवाज उठवते. ते स्वतंत्र्य प्रत्येकाला आहे." विजया रहाटकर यांनी त्यांच्या महिला सशक्तीकरणाच्या यात्रेवेळी हे आपले मत व्यक्त केले.
Updated : 15 Oct 2018 7:45 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire