Home > मॅक्स वूमन > शिक्षक भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तोंडाला पाने का पुसली जात आहेत? - सुप्रिया सुळे

शिक्षक भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तोंडाला पाने का पुसली जात आहेत? - सुप्रिया सुळे

शिक्षक भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तोंडाला पाने का पुसली जात आहेत? - सुप्रिया सुळे
X

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना चांगलेच सुनावले. विनोद तावडेंनी केलेल्या शिक्षक भरतीच्या घोषणेबाबत त्यांना सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन सवाल उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटरवरुन ट्विट केले आहे की, राज्यात २४ हजार शिक्षकांच्या रिक्त जागा सहा महिन्यांत भरण्याची घोषणा विनोद तावडे यांनी फेब्रुवारीत केली होती. अद्याप ही शिक्षक भरती झालेली नाही. दिवसरात्र या भरती परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तोंडाला पाने का पुसली जात आहेत? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/1046604351517732864

याबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या या ट्विटला प्रतिउत्तर दिले. तावडेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, १५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी एकही पद भरले नाही. आज बहुतांश संस्थांचालक यांचेच आहेत. जे कोर्टात जाऊन सरकारच्या ऑनलाईन भरतीवर स्थगिती आणतात. मराठा आरक्षण हा मुद्दा आणून भरती पुढे ढकलतात. वर यांचेच नेते शिक्षकभरती होत नाही अशी सोशल मिडीयावर टिवटिव करतात. शिक्षणात राजकारण केलेले खपवून घेणार नाही. संस्थाचालकांनी कितीही प्रयत्न केले आणि विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी आमचे सरकार शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी खंबीरपणे उभे आहे. पद भरती होणार होणार होणार!, असे ट्विट करुन त्यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

https://twitter.com/TawdeVinod/status/1046636059981824005

https://twitter.com/TawdeVinod/status/1046636173123153920

Updated : 1 Oct 2018 5:56 PM IST
Next Story
Share it
Top