विचारांची मनुस्मृती कधी संपणार?
X
आज २५ डिसेंबर... मनुस्मृती दहन केल्याचा दिवस... आजचा हा दिवस महिला मुक्ति दिन म्हणूनही साजरा केला जातो. मनुस्मृतीचे दहन का केलं आणि ती स्त्रीयांविरोधात जातीविरोधात कशी होती. हे माहित असणं आपल्यासाठी गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना दुय्यम दर्जा देणाऱ्या मनुस्मृतीचे 1927 साली दहन केलं आणि स्त्रीयांना समानतेचा अधिकार मिळाला. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहे. मात्र सुशिक्षित आणि उच्च घरातील महिलांमधील अजनूही मनुचे विचार जिवंत आहेत. रोजच्या दैनंदिन जीवनात जरी संविधानाच्या विचारांची बतावणी होत असली तरी प्रत्यक्षात वागणूक ही मनूवादी विचारांची आहे. मग ते महिलांनी जास्त बोलू नये....स्वइच्छेने काही कार्य, निर्णय घेऊ शकत नाही. असं अनेकदा शहरी आणि ग्रामीण भागातील काही घरांमध्ये चित्र आहे.
जरी आपण आज डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या विचारांची बतावणी करतोय तरीही ते विचार फक्त कागदोपत्री आणि तोंडावर आहे. मात्र रोजच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्षात ते विचारं उतरताना दिसत नाहीये. कदाचित हा प्राचीन काळातील प्रभाव असावा परंतु हा मनु प्रभाव दैनंदिन जीवनातून निघूण जाणं गरजेचं आहे. संविधानाचा मार्ग आपण अवलंबला मात्र प्रत्यक्षात त्या विचारांची कृती दिसत नाही. त्यामुळे संविधानातील विचारांची जागरूकता करणं आणि आत्मसात करणे गरजेचं आहे.