जेव्हा महिला पायलट विमान चालवतात
X
क्रिस्टीन लेग्रे, टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये असोसिएट प्राध्यापक आणि मानसशास्त्राच्या एका संपूर्ण अध्यापन शाखेच्या डायरेक्टरपदी असलेली एक अमेरीकन नागरीक. दोन दिवसांपूर्वी न्यूयॉर्क वरून एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला आली. ज्या विमानाने आली त्या विमानाचे दोन्ही, मुख्य-वैमानिक आणि सह-वैमानिक, महिला पायलट आणि पूर्ण विमानामध्ये पूर्णवेळ महिला फ्लाईट क्रु अत्यंत प्रभावीपणे कार्यरत असलेला हिने पाहिला.
महिला सबलीकरणाचा नारा देणाऱ्या अमेरिकेत सुद्धा अशी परिस्थिती नसल्याचे नमूद करून आपल्या या संदर्भातल्या भावना त्यांनी ट्विटरवर जाहीर केल्या. भारतात जगातल्या कुठल्याही देशापेक्षा जास्त महिला पायलट्स असल्याचा उल्लेख करून या फ्लाईट दरम्यान या कुशल महिला पायलट्सनी विलक्षण सॉफ्ट टेकऑफ आणि लँडिंगचे कौतुक करून या महिला पायलट्सनी हे विमान कुशलतेने वेळेच्या अगोदरच आपल्या पोचायच्या ठिकाणी सुखरूप पोहोचवले असेही तिने आपल्या ट्विटमध्ये नोंदवले.