Home > मॅक्स वूमन > वेदांगीने रचला इतिहास, सायकलवरुन केली १४ देशांची सफर

वेदांगीने रचला इतिहास, सायकलवरुन केली १४ देशांची सफर

वेदांगीने रचला इतिहास, सायकलवरुन केली १४ देशांची सफर
X

प्रवास करणे म्हणजे कायम आपण सहज सोप्या वाहनांना अधिक पसंती दर्शवतो. सध्याच्या काळात सायकलवरुन प्रवास करणे तितकेसे कुणी आढळत नाही. परंतू एका २० वर्षीय मुलीने सायकलवरुन चक्क १४ देशांची सफर केली आहे. ऐकून आश्चर्य वाटेल परंतू तिने अवघ्या १५९ दिवसांत १४ देशांचा तब्बल २९,००० किलोमीटरचा प्रवास तिने सायकलवरुन पार पाडला आहे. वेदांगी कुलकर्णी असे या पुण्याच्या तरुणीचे नाव आहे. ती सध्या लंडनमधील Bournemouth विद्यापीठातून स्पोर्टस मॅनेजमेंट विषयातील पदवी घेत आहे.

वेदांगीने जुलै महिन्यापासून पश्चिम ऑस्ट्रेलियाची राजधानी असलेल्या पर्थ येथून आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. आणि या मोहीमेचा शेवट तिने ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या एका शहरात केला. वेदांगीने आतापर्यंत अनेक सायकल चालवण्याचे अनेक विक्रम केले असले तरीही तिच्या नावावर असलेला हा एक मोठा विक्रम असल्याचे म्हटले जात आहे. यातील सर्वाधिक म्हणजे जवळपास ८० यात्रा तिने एकटीने केल्या आहेत. वेदांगीने मागील २ वर्षांपासून आताच्या पृथ्वी प्रदक्षिणेसाठी तयारी केली होती. तिला या जगप्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण तिने त्यावर मात करत अवघ्या २० व्या वर्षी आपली ही सफर पूर्ण केली. कमी वेळात ही सफर पूर्ण करणारी वेदांगी आशियातील पहिली खेळाडू ठरली आहे.

याबाबत वेदांगी सांगते, दिवसाला मी ३०० किलोमीटर सायकल चालवायचे. मला या सर्व प्रवासादरम्यान माझ्या वाट्याला काही चांगले आणि काही वाईट अनुभव आले. आपले आईवडिल हेच आपली खरी ताकद आहेत असे देखील ती आवर्जून सांगते.

Updated : 24 Dec 2018 6:08 PM IST
Next Story
Share it
Top