रसायनमुक्त खाद्य लढ्यासाठी हजारो महाविद्यालयीन तरुणांची शिवाजी पार्कवर गर्दी
X
आज #किसानदिन या निमित्ताने आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी आणि रासायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे मानवी आरोग्य कसं धोक्यात आलं आहे. याची समाजाला जाणीव करुन देण्यासाठी अंबागोपाल फाउंडेशन तसेच टाटा मेमोरीयल हॉस्पिटल यांच्या वतीने “शिवाजी पार्क दादर ते सिद्धिविनायक मंदिर दादर” #HOSH या “किसान दौड” चं आयोजन करण्यात आले होते.
वाढते आजार आणि दिवसेंदिवस कमी होत चाललेलं लोकांचं आयुर्मान या मुळे आपले जीवन अनैसर्गिक बनत चालले आहे. त्यातच रासायनिक पदार्थामुळे कँसरचा वाढता धोका निर्माण झाला असून हवा, पाणी, जमीन यांच्यातील प्रदषूणामुळे अन्नसाखळीवर वाईट परिणाम झाला आहे.
त्यातच दिवसेंदिवस शेतीमध्ये वाढत चाललेला खतांचा वाढता वापर, अन्नभेसळ, भाज्या-फळं ताजी दिसावीत किंवा लवकर पिकावीत म्हणून वापरण्यात येणारी रसायन या सगळ्यात कुठंतरी माणूसच माणसाचा भक्षक बनत चालला आहे. या सगळ्याला कुठंतरी आळा बसावा या करता आज (23 डिसेंबर) ला सकाळी सात वाजता “किसान दौड” या जनजागृती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं
या कार्यक्रमाला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. साधारण 10,000 लोकांनी तसंच “मावळ मधील शेतकऱ्यांनी” उपस्थिती लावून वॊकेथॉन मध्ये सहभाग दर्शवला. या सोबतच या कार्यक्रमाला मान्यवर म्हणुन अंबागोपाल फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश शेट्टी स्वत: उपस्थित होते त्याचबरोबर खासदार राहुल शेवाळे, टाटा मेमोरीयल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. यावेळी सिक्कीम राज्याच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य देखील 100 टक्के सेंद्रीय शेती असलेले राज्य़ करु असा निर्धार अंबागोपाल फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश शेट्टी यांनी व्यक्त केला.
विषेश बाब म्हणजे यावेळी टाटा हॉस्पिटल मधील गुणवंती
संघवी या कँसर पिडीताने कार्यक्रमाचे उद्घाटन करुन भेसळ युक्त अन्नापासुन दूर रहाण्याचा संदेश दिला.