डोकी असे ते ओठी वसे
X
भारतीय संस्कृतीनुसार महिलांना देवी मानण्याचा प्रकार आपल्या देशात आहे. एकीकडे लक्ष्मी, सरस्वतीची पुजा किंवा तिच्या नावाचा उदोउदो करायचा.मात्र दुसरीकडे विकृत प्रवृत्तीची मानसिकता वाढीला लागली आहे. त्याचे प्रतिबिंब आपल्या समजात तुमच्या आमच्या अवती-भोवती उमटताना पाहायला मिळतेय. त्यानुसार हार्दिक पांड्यानेही महिलाविषयी वादग्रस्त विधान केलं हे याच प्रतिबिंबाचे उदाहरण आहे. यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हार्दिकवर चांगलीच टीका केल्यानंतर त्याने ट्वीटरच्या माध्यमातून माफी मागितली आहे. खरंतर हार्दिकने केलेल्या या वक्तव्याची त्याला जाणीव होताच त्याने माफी मागितल्यामुळे त्याचे कौतुक करायला हवं. मात्र हे सगळ होत असताना एक गोष्ट लक्षात येते की, टीव्ही शो वर त्याने केलेल्या विधानाचे स्पष्टीकरण देताना तो म्हणाला आपण बोलण्याच्या ओघात बोलून गेलो. मात्र आपण जर नीट विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की किती सहजरित्या हार्दिकने महिलांविषयी उदगार काढले आहे. त्याने केलेल्या विधानात आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे तो म्हणाला की, एखादी मुलगी available आहे का हे बघण्यासाठी एकसारखे मॅसेज मी अनेक मुलींना पाठवू शकतो. आणि त्यात त्याला गैर वाटत नाही. खरतरं हा कबुलीजवाब बरचं काही आपल्याला सांगून जातो. की ज्या शो मध्ये तुमच्या डोक्यातील विचार सहज समोर येतात. जिथे आपण जागृक भूमिका घेतो किंवा काही तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मात्र सहज ओघावता प्रश्न विचारल्यास तुमच्या विचारांचा दृष्टिकोन दिसून येतो. तुम्ही जे विचार करता, जी तुमची मानसिकता किंवा तुमच्या डोक्यात जे आहे ते सहजरित्या लोकांसमोर येतेय. त्याने एकच मेसेज अनेक मुलींना केला जरी असला तरी त्या मुलींनी त्याच्यावर आक्षेप घेतला नाही हा त्यांच्या दोघातला समजदारीचा मुद्दा असू शकतो. मात्र त्याच्या या विधानावरुन त्याची महिलांविषयी असलेला विचार म्हणजे ही नाही तर ती आपल्या मिळेल अशी मानसिकता या सगळ्यातून दिसून आली आहे. मात्र या शो मध्ये त्याच्या या विधानाला एक जोक म्हणून थट्टा करत करण जोहर आणि केएल राहुल हसतायत. त्यांना आपण काही चुकीच करतोय किंवा महिलांचा अवमान केल्याची जराही जाणीव नाही अशा प्रकारची भावना कुठेही दिसत नाही. पांड्याने जरी माफी मागितली असली तरी राहुल आणि करण ने माफी मागितली नाही. यामुळे आपल्या समाजात पुरुषसत्ताक पद्धत डोक्यात कशाप्रकारे भिन्नली हे ते हार्दिक पांड्याच्या निमित्ताने पाहायला मिळाली आहे.