दुष्काळ की दुष्काळसदृश असे कागदी घोडे नाचविणाऱ्या सरकारला अखेर जाग आली - सुप्रिया सुळे
X
आज खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन मुख्यमंत्र्यांना दुष्काळ जाहीर केला असला तरी दुष्काळी तालुक्यांची यादी वाढविली पाहिजे असे ट्विट केले आहे.
तसेच दुष्काळी कामेही तातडीने सुरू झाल्यास स्थलांतर कमी प्रमाणात होईल, असे देखील त्यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे.
याआधी त्यांनी अनेक सभांमधील भाषणातून सरकारला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती केली होती. परंतू आता त्यांचे असे म्हणणे आहे की जाहीर केलेल्या दुष्काळामध्ये दुष्काळी तालुक्यांची यादी देखील वाढविली गेली पाहिजे.
त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, बळीराजा सरकारच्या मदतीची वाट पाहत असताना दुष्काळ की दुष्काळसदृश असे कागदी घोडे नाचविणाऱ्या सरकारला अखेर जाग आली. सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी तालुक्यांची यादी वाढविली पाहिजे. दुष्काळी कामेही तातडीने सुरू झाल्यास स्थलांतर कमी प्रमाणात होईल.
https://twitter.com/supriya_sule/status/1057853050369556480