Home > मॅक्स वूमन > सुरभि चंदनाचाही #MeToo ला पाठिंबा

सुरभि चंदनाचाही #MeToo ला पाठिंबा

सुरभि चंदनाचाही #MeToo ला पाठिंबा
X

सध्या देशभरात #MeToo च्या माध्यमातून अनेक महिला आपल्यावर झालेल्या लैगिंक अत्याचाराबाबत आवाज उठवतं आहेत. त्यामुळे सध्या अनेक अभिनेते वा इतरत्र प्रसिद्ध व्यक्तीरेख्यांना या आरोपांना सामोरे जावे लागतं आहे. या चळवळीबाबत अनेक अभिनेत्रींनी आपले मत व्यक्त केले आहे. हिंदी मालिकेतील अभिनेत्री सुरभि चंदनानेही आता #Metoo बाबत सोशल मिडियामार्फत आपले मत व्यक्त केले आहे.

ती म्हणाली की, “या चळवळीच्या प्रभावामुळे अधिकाधिक महिला आपल्यावरील अशा प्रसंगांना वाचा फोडत असून त्यांनी हे काम पुढेही सुरू ठेवावे. टीव्हीवरील कलाकारांची एक प्रतिनिधी या नात्याने मी महिलांना आवाहन करते की त्यांनी आपल्यावर झालेल्या अशा अन्याय-अत्याचारांच्या प्रसंगांना वाचा फोडावी आणि त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला जगापुढे आणावे. आपल्या मनाच्या खोल कप्प्यात साठवून ठेवलेल्या अशा अन्यायाला महिलांनी उघड करावं, यासाठी मी त्यांना मदत करीन. नोकरीनिमित्त अनेक महिला घराबाहेर पडतात. अशा परिस्थितीत कामाच्या ठिकाणी त्या महिलांना सुरक्षित वातावरण मिळावं आणि त्यांचा मान सन्मान आदर राखला गेलाच पाहिजे. हा त्यांचा अधिकार आहे. आपल्याबरोबर काम करणा-या व्यक्तीकडून होत असलेल्या अशा लैंगिक छळाला मूकपणे सहन करण्याची आता गरज उरलेली नाही. चित्रपट क्षेत्रातील काही महिलांनी या मोहिमेचा प्रारंभ केल्यपासून ही चळवळ आता भारतभर पसरली असून ती सर्व क्षेत्रांमध्ये पसरत चालली आहे. अधिकाधिक महिलांनी आपल्यावरील अन्यायाच्या प्रसंगांना या चळवळीच्या माध्यमातून वाचा फोडावी, असे आवाहन तिने केले आहे.

तसेच या महिला या लढ्यात एकट्या नाहीत, असे वक्तव्य करुन तिने या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे.

Updated : 20 Oct 2018 7:05 PM IST
Next Story
Share it
Top