Home > मॅक्स वूमन > सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
X

जन्मत किंवा वयानुसार आलेले बहिरेपण घालवून त्या कर्णबधीर व्यक्तींना, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या आयुष्यात पुन्हा ध्वनीलहरी आणण्याचे कार्य काल खासदार सुप्रिया सुळेंनी केले. सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने या कर्णबधीर नागरिकांना मोफत श्रवणयंत्रे बसविण्यात आली.

काल २६ आँक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, स्टार्की फाऊंडेशन आणि टाटा ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप, आर.व्ही.एस. एज्युकेशनल अँड चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने मोफत श्रवणयंत्र जोडणी शिबिर राबवण्यात आले होते. या शिबिरात जवळ-जवळ आठच तासांत ४८४६ जोडण्या करण्यात आल्या. या कार्यक्रमाची दखल थेट गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. यापूर्वीच्या कार्यक्रमात त्यांनी आठ तासांत ३९११ जोडण्यांचा विक्रम केला होता. खासदार सुप्रिया सुळे या स्वत खास या कार्यक्रमाच्या कामकाजात सहभागी होउन हा कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला. या कार्यक्रमाला खासदार शरद पवार, आमदार अजित पवार, स्टार्की हीअरिंग फाउंडेशनचे अध्यक्ष विल्यम आँस्टिन असे अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूक अकाउंटवरुन सर्वांचे आभार मानले.

Updated : 27 Oct 2018 6:48 PM IST
Next Story
Share it
Top