सुप्रिया सुळे देणार कर्णबधीरांना आधार...
X
आज शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी,पुणे येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान-मुंबई, स्टार्की हिअरिंग फाऊंडेशन - अमेरिका, टाटा ट्रस्ट- मुंबई, पवार पब्लिक चॅरीटेबल ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप, आर.व्ही.एस. एज्युकेशनल अँड चॅरिटेबल फाऊंडेशन - मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य , महात्मा गांधी सेवा संघ-अपंग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमधील ६००० कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरीकांना मोफत श्रवणयंत्र वाटप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
या कार्यक्रमामार्फत १८ जिल्ह्यातील ६ हजार जणांना मोफत श्रवणयंत्र जोडणी शिबीर राबवण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून राज्याच्या विविध भागात हा कार्यक्रम घेतला जात आहे. तसेच या कार्यक्रमाद्वारे आतापर्यंत १५००० कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
श्रवणयंत्र बसविल्यानंतर सबंधित कर्णबधीर मुले आणि ज्येष्ठ नागरीकांची भाषा, वाचा आणि अन्य तदनुषंगिक बाबींच्या लाभार्थ्यांत होत जाणाऱ्या विकासाचा आढावा देखील घेण्यात येतो. या कार्यक्रमामध्ये राज्यातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, जालना, औरंगाबाद, बीड, जळगाव आणि बुलढाणा या जिल्ह्यांतील ६००० लाभार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप करण्यात येणार आहे.