Home > मॅक्स वूमन > राज्यात १ सप्टेंबरपासून राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम सुरू

राज्यात १ सप्टेंबरपासून राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम सुरू

राज्यात १ सप्टेंबरपासून राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम सुरू
X

कुपोषणमुक्तीच्या कार्यक्रमाला गती देण्याच्या तसेच जनमानसात विशेषत: पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१८ दरम्यान राज्यातराष्ट्रीय पोषण महिनाउपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास आणि महिला -बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिली. देशभरात हा उपक्रम राबविण्यात येणार असून महाराष्ट्रात या उपक्रमाला जनचळवळीचे स्वरुप देण्यासाठी यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

'सही पोषण, देश रोशनअसे घोषवाक्य या मोहीमेसाठी निश्चित करण्यात आले आहे. बालकांमधील कुपोषण, खुजेपणा, बुटकेपणा, रक्तक्षय कमी करणे, किशोरवयीन मुली आणि महिलांमधील रक्तक्षय कमी करणे, जन्मत: कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करणे आदी उद्दीष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत. महिला आणि बालविकास विभाग हा या मोहीमेचा नोडल विभाग म्हणून काम करणार असून ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, माहिती व जनसंपर्क, शालेय शिक्षण, आदीवासी विकास, अन्न व औषध प्रशासन आदी विभागांच्या एकत्रीत सहभागातून ही मोहीम राबविली जाणार आहे.

पोषण आहाराविषयी जनजागृतीसाठी राज्यात ग्रामसभा, प्रभातफेरी, चित्रफितीचे प्रदर्शन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. शुन्य ते ०६ वयोगटातील बालकांचे वजन घेणे व छाननी करणे, शौचालयाच्या वापराबाबत तसेच साबणाने हात धुण्याबाबत बालके, महिला, ज्येष्ठ नागरीक आदींना सवय लावणे, ग्रामस्तरावर बेटी- बेटा सांख्यिकी आकडेवारी दर्शविणारा फलक लावणे, बेटी बचाओबेटी पढाओ अभिसरण कृती आराखडा बैठकीचे आयोजन, महिला ई-शक्ती कार्यक्रम, एनएसएस, नेहरु युवा केंद्र, महिला बचतगट, एनजीओ आदींचा सहभाग घेणे, सॅनिटरी नॅपकीनची उपलब्धता सुलभ करणे, महिलांसाठी योगासनांचे महत्व पटवून देणे, चांगल्या आरोग्यदायी सवयींबाबत लोकजागृतीसाठी गृहभेटी करणे, किशोरवयीन मुलींकरीता जनजागृती शिबिर आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन या मोहीमेला जनचळवळीचे स्वरुप द्यावे, असे आवाहन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

Updated : 30 Aug 2018 5:37 PM IST
Next Story
Share it
Top