Home > मॅक्स ब्लॉग्ज > नॉट ओन्ली मिसेस मुख्यमंत्री बट ऑल सो यु टू…

नॉट ओन्ली मिसेस मुख्यमंत्री बट ऑल सो यु टू…

नॉट ओन्ली मिसेस मुख्यमंत्री बट ऑल सो यु टू…
X

झोपेत असणाऱ्याला जागे करता येते, पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना कोण जागं करणार. एकीकडे महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून सोशल मीडियावर महिला सन्मानाचे ढोल पिटवायचे आणि प्रत्यक्षात मात्र, कृती शून्य राहायचे. अशी काहीशी स्थिती आपल्या समाजाची झाली आहे. गेल्या काही दिवसातील घटना पाहता या देशात महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोण खरंच बदलला आहे का? असा प्रश्न मेंदू आणि मन थाऱ्यावर असणाऱ्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जहाजाच्या कडेला बसून एक फोटो काढलाखरं स्वत:चा जीव धोक्यात घालून मुख्यमंत्र्याच्या पत्नीनं असा सेल्फी घेणं चुकीचंचत्यासाठी त्यांनी माफी देखील मागितल. मात्र, अमृता यांच्या या सेल्फीवर ज्या पद्धतीनं अमृता यांनी ट्रोल करण्यात आलंयाला कोणती संस्कृती म्हणायचं. खरं तर मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून, अमृता यांनी मुख्यमंत्री पदाच्या तेजोवलयात हरवून जाता स्वतःचे वेगळे अस्तित्व जपत आपले विचार ठामपणे मांडत आल्या आहेत. मी टू मोहीम असेल वा शबरीमला मंदिर प्रवेश त्या आपली स्त्रीवादी मते बेधडकपणे मांडतात.

सॅनिटरी नॅपकिन सारख्या विषयावर किती राजकारणी महिला पुढे येऊन बोलतात? पारंपारिक पोषाखाला फाटा देत त्या आधुनिक पेहराव पसंत करतात. आपल्या गाण्याची कला त्या जपतात. आर्थिक स्वावलंबन हा देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे. राजकारण्यांच्या सौं नी साखर कारख्यांनाच्या गळीत हंगामाच्या पूजेत, बॉयलर मध्ये ऊसाची मोळी सोडताना, साहेबांच्या हाताला हात लावत मम म्हणण्याची महाराष्ट्राची पूर्वापार परंपरा आहे. मिसेस मुख्यमंत्री म्हणून त्या डोईवर पदर घेऊन हात जोडून साहेबांच्या मागे मम म्हणत उभ्या दिसत नाहीत. त्या गाणे गातात. त्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात रमतात. अमृता या अपरीहार्य राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहातात. सामाजिक आणि कला क्षेत्रातील व्यासपीठावर त्या आत्मविश्वासाने वावरतात. त्या फेमिना मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकतात. पारंपारिक चौकट मोडणार्‍या अमृता फडणवीस तद्दन पुरुषी क्षेत्र असलेल्या राजकीय क्षेत्राला -राजकीय असूनही आव्हान देत आहेत काय ?

मला असं वाटतं, त्या आव्हान देत आहेत. तथाकथित पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणार्‍या, आणि स्त्रीमुक्ती आणि स्त्रीशक्तीचे गोडवे गाणार्‍या सरंजामी वृत्तीच्या राजकारण्यांना, अमृता फडणवीस सारख्या मिसेस मुख्यमंत्री पचनी पडणे कठीणच आहे.

वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुप्रिया सुळे,पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे यासारख्या बोटावर मोजता येतील इतक्या महिला नेत्याच पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. मात्र, त्यांना देखील कधी कधी या ट्रोलच्या विकृतीला सामोरं जावं लागतंयाचे कारण इथल्या समाजाचा स्त्रियांकडे पाहण्याचा बदलेला दृष्टीकोणत्यामुळे नॉट ओन्ली मिसेस मुख्यमंत्री बट ऑल सो यु टू

Updated : 22 Oct 2018 11:27 PM IST
Next Story
Share it
Top