Home > मॅक्स वूमन > …तर शिवसेना रस्त्यावर उतरेल - डॉ. निलम गोऱ्हे

…तर शिवसेना रस्त्यावर उतरेल - डॉ. निलम गोऱ्हे

…तर शिवसेना रस्त्यावर उतरेल - डॉ. निलम गोऱ्हे
X

शिवसेनेच्या महामेळाव्यात डॉ. निलम गोऱ्हे यांनी अनेक पक्षांवर टिका केली. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “ राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि कॉंग्रेस गुंडगिरी करणारे पक्ष आहेत. नगरमधील पोलीस यंत्रणाच हे तीन पक्ष चालवतात, असा सडेतोड आरोप त्यांनी यावेळी केला.

शिवसेनेचा दबाव असल्याचा साक्षात्कार येथील पोलीस अधिकाऱ्यांना कसा होतो आणि पोलिसांचे त्याबाबतचे पत्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना कसे मिळते, असा सवाल देखील निलम गोऱ्हेंनी यावेळी उपस्थित केला. व थेट जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा यांनाच आरोपी ठरवले. त्यानंतर त्यांनी सीआयडीलाही धारेवर धरले. केडगाव गुन्ह्यातील दोन आमदारांना जामीन मिळतो तर त्यावर सीआयडीने अपील का केले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे केडगाव येथील पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या खुनाच्या सूत्रधार माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर याच आहेत. त्यांचे मोबाईलवरील संभाषण उपलब्ध असताना त्यांना अटक का केली जात नाही, असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला. या प्रकरणातील आमदारांचे जामीन रद्द केले नाहीत, तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला.

नगरमध्ये खून करून पुरावा नष्ट करणारी घराणी माहीर होत चालली आहेत, की गुंडाची येथे मिलीभगत आहे. नगरचे जिल्हाधिकारी व महानगरपालिकेचे आयुक्त एकच आहेत. नगर मनपाच्या पायात धोंडा घालण्याचे काम सरकार करीत आहे. नगरला स्वतंत्र आयुक्त देण्याइतका राज्यात अधिकाऱ्यांचा दुष्काळ आहे का? मुंबई महापालिकेची जशी सरकारने कोंडी सुरू केली आहे, तशीच कोंडी नगरचीही केली जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी २३०० कोटी रुपये देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने अजून एक छदामही दिला नाही. भगवा खाली पाडण्यासाठी नगरमध्ये छुपी युती आकाराला येत आहे; परंतु त्यांची योजना यशस्वी होणार नाही, असा इशारा डाॅ. निलम गोऱ्हे यांनी दिला.

Updated : 22 Oct 2018 4:03 PM IST
Next Story
Share it
Top