साजिद खान नेहमी असाच होता - बिपाशा बासू
X
सध्या सुरु असलेली मोहिम चांगलीच चालत आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक दिग्गज व्यक्ती या मोहिमेमुळे वादात आले आहेत. तसचं निर्माता-दिग्दर्शक साजिद खानवर तीन तरुणींनी देखील लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अभिनेत्री सलोनी चोप्रा, रैचल वाइट व एका पत्रकार महिलेने साजिदवर लैंगिक अत्याचाराचा आरोप लगावला आहे. यामुळे साजिद खान चांगलाच वादात अडकला आहे. त्याच्यावरच्या या वादामुळे तो दिग्दर्शित करीत असलेला सिनेमा 'हाऊसफुल ४' चे शुटिंगदेखील थांबवण्याची विनंती अक्षय कुमारने केली होती. तेव्हा तो म्हणाला होता की, "लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱ्यांसोबत मी काम करणार नाही." साजिदची बहिण फराह खाननेही याबाबत साजिद विरुद्ध राहण्याची भुमिका बजावली.
आता याबाबत बिपाशा बासूने आपले मत व्यक्त केले आहे. ती म्हणाली की, "साजिद खान नेहमी असाच होता. तो महिलांसमोरही अश्लील विनोद करायचा. महिलांचा आदर करणे त्याला कधी जमलेच नाही. त्याच्या याच वागण्यामुळे हमशकलनंतर त्याच्यासोबत कोणताही चित्रपट न करण्याचा निर्णय मी घेतला," मात्र, आपल्याला त्याच्याकडून अशाप्रकारचा थेट त्रास कधीही झाला नसल्याचेही तिने स्पष्ट केले.