Home > मॅक्स वूमन > स्त्रियांकडे बघण्याच्या पारंपरिक दृष्टीकोनाला छेद देणारी 'केसर नंदन' मालिका

स्त्रियांकडे बघण्याच्या पारंपरिक दृष्टीकोनाला छेद देणारी 'केसर नंदन' मालिका

स्त्रियांकडे बघण्याच्या पारंपरिक दृष्टीकोनाला छेद देणारी केसर नंदन मालिका
X

निवेदिता सराफ... मराठी सिनेसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री अनेक चित्रपट, नाटकांतून तिनं स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. निवेदिता लवकरच कलर्स वाहिनीवर ‘केसरीनंदन’ या हिंदी मालिकेत झळकणार आहे. यात मालिकेत निवेदिता राणीदेवी या भूमिकेत दिसणार आहे.

काय आहे केसर नंदन मालिका ?

स्त्रियांचं विश्व चूल आणि मूल इतकंच मर्यादित ठेवणाऱ्या समाजातली एका पेहलवानाची छोटी मुलगी एक भव्य स्वप्न पहाते आणि भविष्यात महिला कुस्तीगीर म्हणून प्रसिद्धी मिळवत, ते स्वप्न सत्यात उतरवते. त्या मुलीचा संघर्ष ‘केसरीनंदन’ या मालिकेतून पहायला मिळणार आहे. एका पैलवानाच्या मुलीच्या संघर्षाचाची कथा आहे. राजस्थानच्या पार्श्वभूमीवर हे कथानक आकार घेणार आहे. त्यामुळे तेथील पारंपारिक संस्कृतीचं दर्शनही या मालिकेतून घडणार आहे.

या भूमिकेबद्दल काय म्हणते निवेदिता सराफ

या मालिकेत कुटुंबाच्या सुखासाठी, आनंदासाठी झटणाऱ्या स्त्रीची भूमिका मला साकारायची आहे. पण त्याचसोबत स्त्रियांकडे बघण्याच्या पारंपरिक दृष्टीकोनाला छेद देणाऱ्या अशा मालिकेचा एक भाग असणं ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.' असं निवदेता सराफ यांनी म्हटलंय.

कुंटुबाच्या सुखासाठी झटणाऱ्या एका सोशिक स्त्रीची भूमिका निवेदिता साकारतेय. तिची ही भूमिका प्रक्षेकांना किती भावतेय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Updated : 22 Dec 2018 2:34 PM IST
Next Story
Share it
Top