न्यूझीलंडच्या पंतप्रधान ३ महिन्याच्या बाळासह संयुक्त राष्ट्र महासभेत झाल्या सहभागी
X
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अॅरडन या सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. कारणही अगदी वेगळ आहे. जेसिंडा ह्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला चक्क आपल्या तीन महिन्याच्या मुलीला घेऊन गेल्या होत्या.
एका देशाच्या पंतप्रधानाने आपल्या बाळाला घेऊन महासभेत हजर राहणे हे महासभेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले हे मात्र नक्की. त्यांच्या या गोष्टीमुळे त्या चर्चेत आल्या असून त्यांचे जगभरातून कौतूक केले जात आहे. पंतप्रधान असताना बाळाला जन्म देणाऱ्या अॅरडन या सऱ्या पंतप्रधान आहे. तसेच त्यांचे पती क्लार्क गेफोर्ड हे देखील एका टीव्ही चॅनलमध्ये काम करतात.
परंतू मुलीचा सांभाळ करण्यासाठी ते पत्नीसोबत न्यूयॉर्कला आले आहेत. अॅरडन यांनी महासभेनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या की, "आपण पंतप्रधान असल्यामुळे हा बहुमान आपल्या मुलीला मिळाला. पण प्रत्येक मुलाला असा बहुमान मिळावा हे माझे स्वप्न आहे."