Home > मॅक्स वूमन > ब्राह्मण समाजाच्या ‘या' मागण्यांसाठी पंकजा मुंडे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट...

ब्राह्मण समाजाच्या ‘या' मागण्यांसाठी पंकजा मुंडे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट...

ब्राह्मण समाजाच्या ‘या मागण्यांसाठी पंकजा मुंडे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट...
X

ब्राह्मण समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी २२ जानेवारी २०१९ रोजी मुंबई येथे आझाद मैदानात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास,महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची आज भेट घेतली. व त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. ब्राह्मण समाजाच्या सामजिक,आर्थिक व शैक्षणिक समस्यांवर तोडगा निघावा यासाठी राज्यातील ब्राह्मण समाज एकवटला आहे. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत चर्चा केली.

सौजन्य- सोशल मिडीया

यावेळी ब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करावे, मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधांची खरी परिस्थिती,इतर समाजाला देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती यात असणारी तफावत,सुशिक्षित बेरोजगार युवक यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची गरज,पुरोहित लोकांना मानधन आदी समस्या आणि मागण्या याबाबत चर्चा करण्यात आली. ब्राह्मण समाजाच्या या मागण्यासंबंधीत पंकजा मुंडे यांनी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत सरकार सर्वांच्या सोबत आहे असा दिलासा दिला.

Updated : 29 Dec 2018 7:02 PM IST
Next Story
Share it
Top