तेरी मेरी यारी...
X
वरळीतल्या साधना इमारतीला लागलेल्या आगीमध्ये होरपळलेल्या या अग्निशमन दलातील जवानांचा केईएममध्ये शोध घेत होते. दिड दोन तासांनी पत्ता मिळाला. हळुच वॉर्डमध्ये गेले. प्रश्न विचारले, माहिती खणून काढली...कोपऱ्यात शांतपणे उभी होते. ऑक्सिजनचा मास्क लावलेली मुलगी आहे बावीस वर्षाची, स्वप्नाली चिकणे..वर्षभरापूर्वी फायरब्रिगेडमध्ये भरी झालीय. या आगीतल्या धुरात ती गुदमरली होती. बेशुद्ध पडली. काल दुपारनंतर ती थोडी स्थिरावली..शितल ती आणि सीमा दिव्याला भाड्याची खोली घेऊन राहतात. या दोघी घट्ट मैत्रीणी..शितलने आल्याआल्या स्वप्नालीला एक कडक सॅल्युट ठोकला. पुणेरीत एक कचकचीत शिबी दिली, अन् धूरापायी कशी लटपटलीस गे..म्हणत मिठी मारली..दोघी एकमेकांना धीर देत होत्या. अरे घाबरलीस की काय्ये तू..म्हणत तिने स्वप्नालीची चौकशी सुरु केली. स्वप्नाली हसून नाही म्हणाली. टाळी दिली..शितलने तिचे गाल ओढून वॉर्निग दिली, हे बघ, जीव वाचवणारा डरत नसतो..बाकी कुठल्याबी खात्यात पोरी जातात, फायर मध्ये यायला कलिजा लागतोय, काय...
बावीस वर्षाच्या या पोरींच्या नजरेत, त्यांच्या स्पर्शातून, बोलण्यातून त्यांची यारी लक्षात आली. कुठेही रडारडी नाही, उसासे नाही, धीर देणं, हिंमत बांधणं, आगीशी खेळंय याची याद देणं..
सलाम पोरींनो..तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत..! आपका दोस्ताना सदा सलामत रहे....!