नीला सत्यनारायण यांच्या ‘त्या’ वाक्याचा अर्थ
X
ऐन लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत राज्याच्या निवृत्त निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी ‘ईव्हीएम मशीन्स गुजरातमधूनच का आणल्या’ असं वक्तव्यं केल्याच्या बातम्या सोशल मीडियात व्हायरल झाल्या. त्यानंतर मॅक्स महाराष्ट्रनं यासंदर्भात नीला सत्यनारायण यांच्याकडून या बातमीमागचं सत्य जाणून घेतलं.
अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित होणं ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणूक आयोग फक्त दोनच कंपन्यांकडूनच ईव्हीएम मशीन घेत असतं. भेल आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोन्ही कंपन्या सरकारी असून या कंपन्यांनी तयार केलेला मशीन्समध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येत नाही. मात्र, जर हे मशीन गुजरातच्या सुरतमधून एखाद्या खासगी कंपनीतून आणलेले असतील तर या मशिनची खात्री देता येत नसल्याचं निला सत्यानारायण यांनी म्हटलं होतं.
निवडणूकीमध्ये ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मतदान एका उमेदवाराला केले असता ते दुसऱ्याच उमेदवाराला गेल्याच्या तक्रारी काही ठिकाणी झाल्या हेत. असे प्रकार घडले असतील तर त्याची चौकशी झालीच पाहिजे, असं मत नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केलंय.