माझी जीभ घसरली, मला त्यांच्याबद्दल असे बोलायचे नव्हते - प्रणिती शिंदे
Max Maharashtra | 30 Oct 2018 7:10 PM IST
X
X
काही दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी खासदार शरद बनसोडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं ज्यामुळे त्या वादात आल्या होत्या.
त्याबाबत आता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदेंनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की," प्रणितीचा मला फोन आला होता, पप्पा माझी जीभ घसरली. पण मला त्यांच्याबद्दल असे बोलायचे नव्हते, मात्र माध्यमांनी तेच वाक्य उचललं. खासदार बनसोडे यांच्याबाबत माजी आमदार प्रणितींकडून चुकून बोलले गेले. त्याबाबत त्यांनी माझ्याकडे खुलासा केला आहे. आता हा वाद संपला असून खासदार बनसोडे यांच्याबद्दल आम्हा दोघांनाही आदर आहे," असे बोलून त्यांनी प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याबाबत खुलासा केला.
Updated : 30 Oct 2018 7:10 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire