Home > मॅक्स वूमन > #Me Too च्या मोहिमेमुळे व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळाले - निलम गोऱ्हे

#Me Too च्या मोहिमेमुळे व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळाले - निलम गोऱ्हे

#Me Too च्या मोहिमेमुळे व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळाले - निलम गोऱ्हे
X

आज महाराष्ट्र राज्य महिला आयोग, स्त्री आधार केंद्र, पुणे आणि अस्मिता व्हिजन मनोरम परिवाराच्या यांच्या संयुक्त विद्यामानाने सोलापूर येथे महिला कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते. सोलापूर जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील अँड.प्रदीपसिंग राजपूत, मेडिकल कॉलेजचे स्त्री रोग तज्ञ डॉ.विजय पवार व डॉ.विजय साठे, स्त्री आधार केंद्रच्या पुणे प्रतिनिधी प्रतीक्षा ढमढेरे, अनिता परदेशी, आश्लेषा खंडागळे, सांगली प्रतिनिधी सुनीता मोरे, लातूर प्रतिनिधी नंदकुमार ढेकणे, गौतम गाळफाडे तर अँड.सुरेश गायकवाड, सुनीता पाटील, रुपाली कसबे, कांबळे अश्विनी व इतर विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आ. डाॅ. निलम गोऱ्हे यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, 'जीवनाच्या अनेक क्षेत्रात स्त्रिया कर्तृत्त्वाने व गुणवत्तेने काम करत आहेत. परंतु ही वाट व्यावसायिक स्पर्धा, परिश्रम याबरोबरच काही आव्हानांनी अंधारालेली देखील आहे. स्त्रियांचा शारीरिक उपभोग घेण्यासाठी सत्तेचा दुरूपयोग करणे व त्यासाठी सर्व प्रकारची आमिषे, प्रलोभने यासंकट छळाची देखील तयारी ठेवायची हा प्रकार नवा नाही. गेली पस्तीस वर्ष स्त्री आधार केंद्राचे काम करत असताना या प्रकारच्या शेकडो घटनांनी व्यथित स्त्री कर्मचारी आम्हाला भेटले. प्रवाहाबाहेरच्या स्त्रियांच्या दमनाची अनेक उदाहरणे गेल्या काही वर्षात समोर यायला सुरुवात झाली. त्यातूनच १२ वर्षांपूर्वी #Me Too ची मोहीम सुरुवात झाली. तसेच, ट्विटर वरून या मोहिमेला व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळाले. #Me Too चे वैशिष्ट्य म्हणजे ही व्यक्तिगत कैफियत प्रतिनिधित्व बनत चालली आहे. 'लैंगिक छळ किंवा बलात्कार झालेली मुलगी घटना घडल्या बरोबर त्या घटनेबाबत स्वतःचे मन मिटून होते, बोलावेसे वाटते पण बोलता येत नाही तो प्रसंग डोळ्यासमोर परत परत येतो व तिचे मत घृणा-किळस याने जखमी राहते. काहीवेळा आत्महत्येचे विचार तिच्या मनात येतं असतात. जवळचे आप्तस्वकीय कितपत संवेदनशील पध्दतीने वागतात यावर तिच्या मनाची उभारी अवलंबून असते.' यासाठीच पोलीस, एकूण न्यायव्यवस्थेत संवेदनशील कार्यपद्धतीचा आग्रह मी धरत आहे.

Updated : 20 Oct 2018 7:59 PM IST
Next Story
Share it
Top