#मी टू शी संबंध नसलेले आमदार
X
मी टू मोहीमेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मीटू कुणासाठी फायद्याचं तर कुणासाठी त्रासदायक ठरू लागलंय...मात्र, शिवसेनेचे औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट यांना मात्र अजूनही मी टू या मोहीमेविषयी काहीच माहिती नाही...असं असतांनाही वरवरच्या माहितीवर आमदार शिरसाट म्हणतात की, मी टू मुळे महिलांच्या नोकऱ्यांवर टाच येऊ शकते...शिवाय महिलांनी चुल आणि मुलं सांभाळावीत अशी मुक्ताफळंही त्यांनी उधळलीय. त्यामुळं आमदार शिरसाट टीकेचे धनी होत आहेत.
सध्या मीटू चे वादळ जोर धरत आहे. अशा परिस्थितीत दिवसागणिक नवनवीन अत्याचाराची प्रकरणं बाहेर येत आहेत. मात्र, शिवसेना आमदार शिरसाट यांना मी टू ही मोहीमच कळालेली दिसत नाही, असं वाटतेय...त्यातही शिरसाट यांनी ग्रामीण-शहरी असा महिला अत्याचारात फरक केलाय... व काही वर्गापुरतीच ही मोहीम असल्याच ते म्हणतात.खरं तर महिलांच्या अत्याचारात असा भेदभाव ठेवणंच गैर आहे.आमदारच जर मीटू सारख्या मोहीमेविषयी फारसे गंभीर नसतील तर इतरांकडून फारशी अपेक्षा ठेवणंच गैर आहे...
शिरसाट यांना एवढचं सांगायचे आहे महिलांना नोकरी जाईल म्हणुन अन्याय सहन करा अस सांगताना किमान जे अन्याय करतात त्यावर कारवाई करु इतक आश्वासक वातावरणही तुम्हाला देता येत नसेल तर तुम्ही लोकप्रतिनीधी तरी कसे म्हणवता ? महिला शहरात असली किंवा ग्रामीण भागात असली तरी तिचे शोषण होते त्यामुळे ग्रामीण आणि शहरी असा काही भाग नाहीये... आणि राहिला मुद्दा सक्षमीकरणांचा तर महिलांचे नोकरीत प्रमाण वाढले किंवा अशा अन्यायाविरोधात उभारले तरीही त्यांचं सक्षमीकरण हे होणारचं... आणि शिरसाठ साहेब महिला काही खेळणी नाही की तिचं कधीही लैंगिक शोषण केलं जाऊ शकते आणि तिने त्याची वाच्यता केली की, स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवून मिरवणारे तुमच्यासारखे लोक अशा मोहिमांची खिल्ली उडवता.... तुमच्या माहितीसाठी... शिरसाट साहेब... महिला घरदार सांभाळून नोकरी ही करू शकतात. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात त्यांच्या सोबत होणाऱ्या अत्याचारालाही तोंड देऊ शकतात. म्हणून साहेब तुम्हीच जपून शब्द वापरा...आता राहता राहिला प्रश्न महिलांनी घर, मुलांना सांभाळावं, त्यांच्यावर संस्कार करावेत, हा तुमचा सल्ला...अहो, तुम्हीही कुठल्यातरी आईच्या पोटी जन्मच घेतलाय ना...तेव्हा तुम्ही तुमच्या घरातल्या महिला-भगिनींना हा सल्ला देऊन पाहा...त्यांचं उत्तर-प्रतिक्रिया हीच तुमच्या बेताल वक्तव्यावर योग्य उत्तर ठरू शकतं...