मनुस्मृती अजुनही जीवंत का?
X
२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २५ डिसेंबरला राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. खरतर संविधान मनुस्मृतील विचारांशी अनेकांची मते आज जुळत नाही, मात्र असे असले तरीही दरवर्षी याच दिवशी मनुस्मृती दहन करून आपण नक्की काय साध्य करतो? याचा विचारही आपल्याला करावासा वाटत नाही. दस-याला ज्या प्रमाणे रावण दहन केले जाते त्या प्रमाणे मनुस्मृती दहनाचा आपण केवळ सोहळच करतो आहोत का ? असा प्रश्न आपल्या कोणालाही पडत नाही नाहीतर ९० वर्षा नंतरही आपल्याला मनुस्मृतीतले विचार मान्य नाही असे सांगतो आणि दिवसा ढवळ्या केवळ एका स्त्रीने स्वत:च्या मर्जीने निर्णय घेतला म्हणुन खुनही करण्यास कमी करत नाही अश्या वेळेस आपण मनुस्मृती जाळून ती परत आपल्या डोक्यात जिवंत करतो का? मग मनुस्मृती केवळ जाळण्याचे कार्यक्रम करतो का?