महिलांच्या गर्भपिशवीची का होतेय चोरी?
Max Maharashtra | 18 July 2019 5:50 PM IST
X
X
का काढले जातात महिलांचे गर्भाशय? डॉ. नीलम गोऱ्हे मागवला रुग्णालयाकडून अहवाल
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे महिलांचे गर्भाशय काढण्याचंही प्रमाण या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. याच प्रकरणी अनेक बातम्या समोर आल्या असून नुकतेच २० वर्षांच्या महिलांचे गर्भपिशवी काढल्याचे विधी मंडळाद्वारे स्थापित राज्यस्तरीय चार सदस्यीय समितीच्या निर्दशनास आलं आहे. त्यामुळे महिलांचे गर्भाशय का काढले गेले या बाबतीत जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत संबंधित रुग्णालयाकडून अहवाह मागवण्यात आला आहे. असं समितीच्या अध्यक्षा तसेच विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी गावातील महिलांशीही संवाद साधला आहे. तसेच ऊसतोड महिला कामगारांच्या दृष्टीने आरोग्यपूर्ण सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी उपाय योजना करण्यास प्राधान्य देण्याची शिफारस करू तसेच या प्रकरणात पुरुषांचे प्रबोधन करण्याचीही गरज आहे. मुलांचे शिक्षण, सुरक्षा, आरोग्य, स्वच्छतागृहे अशा विविध प्रश्नांबाबत राज्यस्तरीय समिती अहवाल देईल असं उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.
https://www.youtube.com/watch?v=4mR7uNOLfbw&t=7s
दरम्यान बीडमध्ये नेमकी महिलांच्या आरोग्याची सद्यस्थिती काय आहे. समितीच्या निर्दशनास आलेल्या प्रकाराची चौकशी कशी होणार आहे... यावर प्रियदर्शनी हिंगे यांनी मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याशी केलेली बातचीत पाहा...
https://www.youtube.com/watch?v=vvhx1IpP6ck&feature=youtu.be
का काढलं जातं महिलांचं गर्भाशय ?
Updated : 18 July 2019 5:50 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire