चंद्र मंगळाकडे झेपावणाय्रा देशात बाई ट्रॅक्टरमध्ये बाळंत होते!
X
देशात मंगळ चंद्र मोहीम एका बाजुला चर्चेत आली असताना गडचिरोली जिल्ह्यातल एक एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे. साधारण गावात रुग्नाचा संघर्ष दवाखान्यात सुरु होतो पण येथे रुग्नाला दवाखान्यात पोहचवायलाच असंख्य अडचनींना सामोरे जावे लागते. असाच प्रसंग आज भामरागड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाय्रा हितापडी गावातील आज एका महीलेवर आला. शांती राकेश पुंगाटी वय(27) या महीलेला प्रसववेदना सुरु झाल्याने रुग्नालयात नेण्यासाठी नातेवाइकांनी रुग्नालयात माहीती दिली. रुग्नवाहीकेसोबत आरोग्य कर्मचाय्राचा चमु हितपडी गावाच्या दिशेने निघाला. पण गावापर्यंत पक्का रस्ता नसल्याने रुग्नवाहिका मध्येच उभा करावी लागली. सदर महीलेला गावातुन कसे आणायचे हा प्रश्न उभा राहीला. अचानक त्यांना ट्रॅक्टर बोलवावा लागला. सदर महीलेला ट्रॅक्टर मध्ये बसउन नेत असतानाच ट्रॅक्टर मध्येच त्या महीलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. रुग्नवाहीकेजवळ पोहचल्यावर दोघांना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणन्यात आले. डॉक्टरांनी वेळेवर दिलेल्या योगदानाने आई व बाळ दोघेही सुखरुप आहेत. प्रतिकुल परीस्थितीतही योग्य रुग्नसेवा पुरवणाय्रा भामरागड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलींद मेश्राम तसेच डॉ. रुचिदा दाडगे , परीचारीका भाती सपना कुमरे वाहनचालक पिंठुराज मंडलवार एम पी डब्ल्यु चिब्लुके यांचे नातेवाईकांनी आभार मानले. एका बाजुला मंगळ आणि चंद्राकडे झेपावणाय्रा आपल्या देशात आरोग्याच्या सेवांची प्राथमिक गरजांचा अभाव हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे.