महिलेवर बिबट्याचा हल्ला : शासकीय मदतीचा चेक फोटो काढून परत घेतला !
X
आरे वसाहती मधील खांबाची वाडी परिसरात सविता संतोष वरठे गेल्या कित्येक दिवसापासून वास्तवास आहेत. २०१३ साली नळावर पाणी भरत असताना त्यांच्यावर बिबटयाने हल्ला केला होता. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
वनजीव हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्या व्यक्तीला शासकीय मदत दिली जाते. मात्र, शासनानने त्यांना वारंवार पाठपुरावा करुनही मदत केलेली नाही. असं सुविधा सांगतात.
या संदर्भात बोलताना सविता म्हणते
"मी काम करेन तेव्हाच घरात अन्न शिजतं, माझ्या पतीचा मृत्यू झालेला आहे. बिबटयाने हल्ला केला तेव्हा मी, त्यातून बचावले. मात्र, शासनाची मदत मिळालीच नाही, दवाखान्याचा खर्च सुद्धा दिला नाही, ती मदत मिळावी यासाठी मी ठाणे, मंञालय अनेक अधिकाऱ्यांना भेटले. मात्र, मला मदत दिलीच नाही. मला मदत मिळाली अशी अफवा पसरवली मला फसवलं.. माझ्या घरात गॅस नाही, वीज नाही. माझ्यावर बिबटयाने हल्ला केल्यापासुन जनावरांची भिती वाटते. अंधारात जनावर घरात आलं तर माझ्या मुलांचं कसं होईल? जीवाच्या साठी मी वीज मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले. मात्र, टाळाटाळ केली जाते .उज्ज्वला गॅस योजना तर आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. कोणी मदत करत नाही. कसं जगावं हेच कळत नाही. गरीबाचं कोणी नसतं.’
हे ही वाचा
गांधीजी आम्हाला माफ करा – हेमंत देसाई
अमित शहांवर निर्बंध घालण्याची मागणी
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला झुकतं माप ! कोणत्या पक्षाकडं असणार कोणतं खातं?
घरात कोणी कर्ता माणूस नसल्यानं ती आपल्या व्यवस्थेशी भांडू शकत नाही. तीने शासकीय मदत मिळण्यासाठी शासनाचे अनेक वेळा उंबरठे झिजवले. तरी तिला मदत मिळाली नाही. आपल्याला फक्त मदत मिळेल. इतकंच आश्वासन दिलं गेलं आहे. तिच्यावर हल्ला झाला. तेव्हा तिच्या हातात मदतीचा चेक दिला आणि फोटो काढला. मात्र, तिला मदत मिळाली नाही.
त्यामुळं सविताचे पैसे कुणी घेतले का? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. कारण सविताच्या नावाने जर चेक निघाला असेल तर तो चेक कुठं गेला. की, शासन फक्त माध्यमांना दाखवण्यासाठी अशी फोटो मोहीम राबवते. की अधिकाऱ्यांने मध्येच पैसे लाबवले? असे एक ना एनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.